Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Religious Tourism: धार्मिक पर्यटनात कोरोनानंतर मोठी वाढ; हॉटेल व्यवसायाला कसा होतोय फायदा?

Religious Tourism

कोरोना काळात धार्मिक स्थळे बंद होती. तसेच प्रवासावर निर्बंध असल्याने नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. मात्र, 2022 पासून पुन्हा धार्मिक पर्यटनाने वेग पकडला आहे. अध्यात्मिक आणि मन:शांती मिळवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा फायदा हॉटेल व्यवसायाला होत आहे. Yatra.com वर 40% पेक्षा जास्त हॉटेल सर्च धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरांमध्ये केले गेले.

Religious Tourism: देशभरातच नाही तर संपूर्ण जगात धार्मिक पर्यटनात वाढ होत आहे. भारतामध्ये धार्मिक पर्यटनाला येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्याही वाढत आहे. कोरोना काळात धार्मिक स्थळे बंद होती. तसेच प्रवासावर निर्बंध असल्याने नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. मात्र, 2022 पासून पुन्हा धार्मिक पर्यटनाने वेग पकडला आहे. अध्यात्मिक आणि मन:शांती मिळवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा फायदा हॉटेल व्यवसायाला होत आहे.

धार्मिक पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत

देशभरातील ज्या शहरांमध्ये प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत तेथील हॉटेल व्यवसाय तेजीत आला आहे. येथील हॉटेल्स खोल्यांची संख्या वाढत आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांकडून नवीन हॉटेल्स उभारण्यात येत आहेत. ऑनलाइन हॉटेल बुकिंग सेवा पुरवण्याऱ्या कंपन्या, जसे की, मेक माय ट्रिप, ओयो, ट्रिवागो यासह इतरही कंपन्यांना धार्मिक पर्यटनातून जास्त नफा मिळत आहे. इतर ठिकाणांच्या हॉटेल बुकिंगपेक्षा 44% जास्त बुकिंग धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरात होत आहे. भारतामध्ये फक्त हिंदूच नाही तर सर्व धर्मियांचे पवित्र स्थानांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टाटा ग्रूपचे अयोध्येत दोन नवीन हॉटेल्स

टाटा ग्रूपमधील इंडियन हॉटेल कंपनी अयोध्येत दोन नवीन हॉटेल्स सुरू करत आहेत. ताज हॉटेल्सचे व्यवस्थापनही याच कंपनीकडून पाहिले जाते. विवांता आणि जिंजर या ब्रँडनेमखाली नवी हॉटेल्स उभारल्या जाणार आहेत. श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या वृंदावन शहरातही टाटाचे नवे हॉटेल उभारले जाणार आहे. श्रीकृष्णाचे भक्त संपूर्ण जगभरात असून दरवर्षी लाखो भक्त वृंदावनमधील पवित्र धार्मिक स्थळाला भेट देतात. सोबतच वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये शंभर खोल्या आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे. इतरही आघाडीच्या हॉटेल व्यवसायातील कंपन्या आपला व्यवसाय वाढवत आहेत.

Wyndham Hotels & Resorts ही जगातील आघाडीची हॉटेल व्यवसायातील कंपनी आहे. ही कंपनी अयोध्या, तिरुपती, शिर्डी आणि पुष्कर या धार्मिक स्थळी नवी हॉटेल उभारण्याचे नियोजन आखत आहे. अजमेर, द्वारका, वाराणसी, अमृतसर या ठिकाणीही कंपनीची हॉटेल्स आहेत. या शहरांमधील हॉटेलचा व्यवसायही चांगला होत आहे. Sarovar Hotels and Resorts ही कंपनीही प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या शहरांमध्ये हॉटेल्स उभारण्याचे नियोजन आखत आहे. अयोध्या शहरात ओयो कंपनीच्या 50 नवी हॉटेल्स उभारली जात आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशेनसाठी गोव्यापेक्षा जास्त बुकिंग वाराणसी शहरात झाले होते, असे ओयो कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले.

आयटीसी या हॉटेल व्यवसायातील आणखी एका मोठ्या कंपनीचे देशभर हॉटेल्स आहेत. उदयपूर, कटरा, धरमशाला, अमृतसर आणि हरिद्वार शहरात कंपनीची मोठी हॉटेल्स आहेत. धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांकडून ब्रँडेड हॉटेलची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यात्रा डॉट कॉम आणि मेक माय ट्रिपची आकडेवारी काय सांगते?

Yatra.com वर 40% पेक्षा जास्त हॉटेल सर्च धार्मिक स्थळे असणाऱ्या शहरांमध्ये केले गेले. फक्त सर्च नाही तर त्यानंतर बुकिंग करणाऱ्यांची संख्याही जास्त होती. यामध्ये वाराणसी, हरिद्वार, तिरुपती, शिर्डी, कटरा, अमृतसर, रामेश्वरम या पवित्र धार्मिक शहरांचा समावेश आहे. वाराणसीतील काशी मंदिराचे नूतनीकरण केल्यानंतर भाविकांची गर्दी वाढली आहे. कोविड साथ पूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करता धार्मिक स्थळे असलेल्या शहरांमधील हॉटेलची मागणी 44% ने वाढल्याचे मेक माय ट्रिपने म्हटले आहे.