रिलायन्स, आयआरसीटीसी, ल्युपिन या कंपन्यांची बाजारात चर्चा सुरू आहे. कंपनीची सध्याची कामगिरी आणि भविष्यातील व्यवसाय वाढीचे नियोजन यांसारख्या निर्णयांवर कंपनीचे बाजारातील मूल्य ठरत असते. अनेक वेळा काही नकारात्मक बातमी आल्यानंतर कंपनीचा बाजारभाव गडगडतो. सध्या खाली दिलेल्या काही कंपन्यांची बाजारात चर्चा सुरू आहे.
Table of contents [Show]
रिलायन्स जिओ -
इंधन ते दूरसंचार क्षेत्रातील महाकाय उद्योगसमूह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने जाहीर केले आहे की, तिची उपकंपनी Reliance Jio Infocomm Limited ला SD-WAN (सॉफ्टवेअर डिफाइंड वाइड एरिया नेटवर्क) सोल्यूशन देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून ऑर्डर मिळाली आहे. इंडियन ऑइली ७ हजार २०० आऊट लेट आणि इतर महत्त्वाची उद्योग प्रक्रिया चालणाऱ्या ठिकाणी नेटवर्क उभारणीचे काम जिओला मिळाले आहे.
रेल्वे विकास निगम
रेल्वे विकास निगम कंपनीला सुरत मेट्रो उभारणी प्रकल्पामधील वर्कशॉप उभारणीचे मोठे कंत्राट मिळाले आहे. सुरत मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू असून हे कंत्रात सुमारे १९८ कोटी रुपयांचे आहे.
ल्युपिन फार्मा कंपनी
रक्तदाब असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी असलेली एक टॅबलेट ल्युपिन फार्मा कंपनीने माघारी बोलावली आहे. कंपनीने स्वत:हून क्विनाप्रिल या टॅबलेटचे चार लॉट बाजारातून माघारी बोलवले आहेत. एन-नायट्रोसो-क्विनाप्रिल या नायट्रोसामाइन अशुद्धतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला. या गोळ्यांमधील हे कंटेट व्यक्तीच्या शरिरात असण्याची मर्यादा ओलांडत असल्याचे नुकत्याच केलेल्या चाचणीत आढळून आले होते. ल्युपिनने सप्टेंबर महिन्यात क्विनप्रिल गोळ्यांची मार्केटिंग बंद केली होती. याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या बाजारमूल्यावर पडू शकतो.
आयआरसीटीसी -
भारत सरकार पात्र कर्मचार्यांना कंपनीचे 40 लाखांपर्यंत इक्विटी शेअर्स 680 रुपये प्रति शेअर या किमतीने ऑफर करण्याचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. कर्मचार्यांसाठी ही ऑफर 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर कालावधीत सुरू राहील.
बँक ऑफ महाराष्ट्र -
बँक ऑफ महाराष्ट्राने प्रायव्हेट प्लेसमेंट च्या आधारावर बाजारातून 880 कोटी उभारले. बँकेला एकूण ९९० कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. बँकेने 8.74 टक्के दराने 200 कोटी रुपयांच्या बेस इश्यूसह आणि 680 कोटी रुपयांपर्यंत राखून ठेवलेल्या ग्रीन शू पर्यायासह 880 कोटी रुपयांची बोली स्वीकारली आहे.