“उम्मीद वर्षो से दहलीज पर खड़ी वो मुस्कान है, जो हमारे कानो में धीरे से कहती है की “सब अच्छा होगा” !!! अर्थातच “सगळं काही नेहमीच सुरळीत व्हावं” अशी इच्छा, आशा आपल्यापैकी प्रत्येकाची असतेच की. पण सर्वच गोष्टी आपण "प्रोग्रॅम्ड" केल्याप्रमाणे चालू राहतात काय! टीव्ही-रिमोटचा सेल संपण्यापासून ते आपण प्रवास करीत असलेल्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगपर्यंत अनपेक्षित घटनांसाठी आपण नेहमीच तयार असतोच का! पण काही इन्शुरन्स प्लॅन्स डिजाईनच असे केले गेले जातात, की ज्यामध्ये जास्तीत जास्त संभाव्य धोक्यांचा विचार केलेला असतो आणि त्यापासून होऊ शकणाऱ्या नुकसानापासून आर्थिकदृष्ट्या संरक्षित केले जाऊ शकते. अलीकडेच रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने सर्वव्यापी हेल्थ इन्शुरन्स कव्हर अर्थात आरोग्य विमा उत्पादन “रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी” सादर केली आहे. (Reliance Health Infinity Policy)
रिलायन्स कंपनीच्या दाव्याप्रमाणे, अशा प्रकारची क्रेडिट स्कोअर आधारित आणि “BMI - बॉडी मास इंडेक्स”वर आधारित म्हणजेच पॉलिसी-इच्छुक व्यक्ती स्वतःच फिटनेस राखून असल्यास त्याला प्रिमिअमच्या रक्कमेवर सवलत ऑफर करणारी भारतामधील पहिली पॉलिसी आहे. ही एक पॉलिसी वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर (8 सदस्यांपर्यंत) प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि 5 लाख ते कोटी 5 रुपयांपर्यंत हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज प्रदान करते. अगदी 91 दिवसांच्या बालकापासून आणि 18 ते 65 वर्षे वयोगटातील प्रौढ व्यक्तींचा या पॉलिसीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. “फॅमिली फ्लोटर पॉलिसी” अंतर्गत, कुटुंबातील मुलीचा इन्शुरन्स करताना पॉलिसीमध्ये 5% सवलत दिली जाणार आहे. तसेच प्रपोजर व्यक्ती महिला असल्यास अधिकची 5% सूट मिळते. शिवाय हे हेल्थ कव्हर “Multi-year” स्वरूपाचे असल्याने एकदाच पैसे भरून 2 किंवा 3 वर्षांसाठी देखील हेल्थ कव्हर प्राप्त करून घेता येणार आहे.
या हेल्थ कव्हरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अंतर्भूत असलेले 'More' ऑप्शन्स बेनिफिट–More Cover आणि More Time ऑप्शन्स आपण निवडलेल्या विम्याची रक्कम अतिरिक्त ३० टक्क्यांनी आणि पॉलिसीचा कालावधी अधिकच्या 1 महिन्यापर्यंत वाढविण्याची संधी देतात, MoreGlobal ऑप्शन “वर्ल्ड सिटिझन्स” असणाऱ्या व्यक्तींना हेल्थ-कव्हरची व्याप्ती “जगामध्ये कोठेही आरोग्य-सुविधा” स्वरूपात ऑफर करतो. ज्यामुळे या व्यक्तींना अगदी एअर-ॲम्ब्युलन्स पासून OPD सुविधांपर्यंत देशाबाहेरील हॉस्पिटल्समध्ये देखील नियोजित (Planned) आणि आपत्कालीन (Unplanned) वैद्यकीय उपचार करून घेता येणे, शक्य होणार आहेत.
विम्यासह मिळतात हे फायदे (Benefits with Reliance Health Infinity Policy)
- 5 कोटी पर्यंतच्या कव्हरेजसोबत, प्री-हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशनचा खर्च.
- डॉक्टरांच्या सल्ल्याची काळजी घेणारे OPD कव्हर, 12 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीसह 2 लाखांपर्यंतचे मॅटर्निटी कव्हर.
- यासारखे 15 हून अधिक ॲड-ऑन बेनिफिट्स देखील उपलब्ध आहे.
- याव्यतिरिक्त, नवजात बालकांचा देखील “पोस्ट-डिलिव्हरी केअर बेनिफिट्स’मध्ये समावेश आहे.
- हॉस्पिटलायझेशनचा खर्च 8 ते 10% पर्यंत प्रभावित करणारे सिरिंज-हॅन्ड ग्लोव्ह्जवरील खर्चदेखील कव्हर केला आहे.
- आपत्कालीन ॲम्ब्युलन्सपासून ऑर्गन डोनेशन पर्यंतच्या विशेष उपचारांसाठीच्या खर्चांविरुद्ध संरक्षण देखील उपलब्ध करून दिले गेले आहे.
- रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी CoviD-19 उपचार खर्च कव्हर करतेच,
- स्टेम सेल थेरपी, रोबोटिक सर्जरी, आय-करेक्शन सर्जरी, इ. शस्त्रक्रिया विशेष उपचार म्हणून समाविष्ट.
- याव्यतिरिक्त मेंटल हेल्थकेअर ॲक्ट, 2017नुसार, या हेल्थ कव्हर अंतर्गत पार्किन्सनस् आजार आणि अल्झायमर आजार यांसारख्या मानसिक व्याधी देखील कव्हर केले जाणार आहेत.
ऑनलाइन पॉलिसी खरेदी करता येईल (Online Option Available to buy)
“रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी” ऑनलाइन उपलब्ध आहे. या हेल्थ कव्हरकरिता ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सद्वारे ऑनलाइन प्रपोजल फॉर्म भरू शकता. “ऑनलाईन” पद्धतीने खरेदी केलेल्या हेल्थ पॉलिसीवर कंपनीने 10% सवलत देऊ केली आहे. जोपर्यंत इन्शुरन्स कव्हरची रक्कम संपत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या कव्हर-अंतर्गत एका वर्षात कितीही मेडिकल क्लेम्स दाखल करू शकता. ऑनलाइन डिस्काउंट, दीर्घकालीन पॉलिसी डिस्काउंट, प्राइम डिस्काउंट, Covid-19 व्हॅक्सीन डिस्काउंट आणि अगदी पॉलिसी नूतनीकरण (renewal) डिस्काउंट यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी अंतर्गत प्रीमियमवर 35% पर्यंत बचत मिळवू शकता.