Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Available on Discount: 'Redmi Book Pro' हा लॅपटॉप मिळणार एकदम स्वस्तात, जाणून घ्या कुठे मिळत आहे डिस्काउंट

Laptop Available on Discount:

Image Source : http://www.gadgetmatch.com/

Flipcart Sale: तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्डवर रेडमीचा लॅपटॉप एकदम स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे, जाणून घ्या थोडक्यात.

Laptops Available at Low Prices: सध्या लॅपटॉप ही गरज बनली आहे. पूर्वी तर नोकरदार वर्गासाठी लॅपटॉप ही गोष्ट महत्वाची होती. आता मात्र विद्यार्थ्यांजवळ देखील लॅपटॉप असणे गरजेचे झाले आहे. कोरोनामुळे आॅनलाइन शिक्षणावर ज्यावेळी जोर देण्यात आला होता, त्यापासून लॅपटॉप, मोबाईल या वस्तू गरजेच्या वाटू लागल्या आहेत. जर तुम्हाला देखील हा लॅपटॉप खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्ट हा एक चांगला पर्याय आहे. या ठिकाणी ‘रेडमीचा लॅपटॉप’ (Redmi Laptop) अत्यंत स्वस्त किंमतीत मिळत आहे.

किती डिस्काउंट आहे? (How Much is The Discount)

फ्लिपकार्टवर Redmi Book Pro हा लॅपटॉप अगदी स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपची मुळ किंमत 49,499 रूपये इतकी आहे. तर फ्लिपकार्टवर हा लॅपटॉप 39,990 रूपये या किंमतीत मिळत आहे. या लॅपटॉपवर कंपनीने साधारण 10,009 रूपयांची मोठी सूट दिली आहे. डेबिट व क्रेडिट कार्डव्दारे खरेदी केल्यास 1000 रूपयांची त्वरित सूट मिळेल. याशिवाय या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. फक्त ती तुमच्या लॅपटॉपच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

Redmi Book Pro चे फीचर्स

Redm iBook Pro या लॅपटॉपवर एकापेक्षा एक जबरदस्त ऑफर आहे. त्यामुळे तुम्ही जर लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या लॅपटॉपचे फीचर्सदेखील शानदार आहेत. जसे की, या लॅपटॉपसोबत मल्टी टच ट्रॅकपॅड बेझल्स देण्यात आले आहेत. तसेच याचा कीबोर्ड बॅकलिट आहे. हा लॅपटॉप वेबकॅम किंवा फ्रंट कॅम 720p (HD) रिझोल्यूशनसह उपलब्ध आहे. या लॅपटॉप एचडी स्क्रीन ही  15.6 इंच आहे. तर त्याची स्क्रीन अँटी-ग्लेअर आहे. या लॅपटॉपचे वजन 1.8 किग्रॅ आहे.  हा लॅपटॉप ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. तसेच  Redmi Book Pro मध्ये 11th Gen Tiger Lake Intel Core i5-11300H चिपसेट दिला असून त्यासोबतच Iris Xe iGPU, 8GB रॅम व 512GB SSD स्टोरेजदेखील देण्यात आले आहे.