• 28 Nov, 2022 16:36

रिअल इस्टेटला अच्छे दिन; 'बीकेसी'तील प्रॉपर्टीसाठी 66 कोटींचे डील

Real Estate Deal In Mumbai

Mumbai Property Deal: कोरोनानंतर मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड तेजी दिसून आली आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वरळी,मलबार हिल यासारख्या प्राईम लोकेशनवर अलिकडच्या काळात प्रॉपर्टींची शेकडो कोटींची डील झालेली आहेत.

मुंबईतील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोना पश्चात मुंबईत रिअल इस्टेटमध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. केवळ दक्षिण मुंबईपुरताच नव्हे तर मध्य मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रॉपर्टींना सोन्याचा भाव मिळत आहे. नुकताच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये(बीकेसी) एका प्रॉपर्टीसाठी 70 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुपरमार्केट्ची साखळी असलेल्या डिमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेविल नोरोन्हा यांनी ‘बीकेसी’मध्ये दोन प्रॉपर्टीजसाठी 70 कोटी खर्च केले आहेत.

नोरोन्हा यांनी बीकेसी 9,552 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या दोन प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मुंबईचे बिझनेस हब असलेल्या बीकेसीमधील एका अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये नोरोन्हा यांनी दोन प्रॉपर्टीजची बुकिंग केली आहे. रुस्तमजी सिजन्स या प्रोजेक्टमध्ये 10 पार्किंगची जागा मिळाली आहे. नोरोन्हा यांनी दोन प्रॉपर्टीजची 66 कोटींना खरेदी केली आहे. यासाठी 3.30 कोटींचे मुद्रांक शुल्क भरले आहे. ‘बीकेसी’मध्ये निवासी प्रकल्पात अलिकडच्या काळात झालेला हा मोठा व्यवहार ठरला आहे. बीकेसीमध्ये बहुतांश कंपन्यांची कार्यालये आहेत. मुंबईचे बिझनेस हब म्हणून बीकेसीची ओळख आहे.  

2021 मध्ये  बिलेनिअर्स क्लबमध्ये नेविल नोरोन्हा यांचा समावेश झाला होता. डिमार्टची पालक कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरने ऑक्टोबर 2021 मध्ये 5,899 रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. अव्हेन्यू सुपरमार्टच 2 टक्के शेअर असलेल्या इग्नाटिअस नेविल नोरोन्हा यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली होती.या तेजीनंतर नोरोन्हा यांची संपत्ती 7,744 कोटी रुपयांपर्यंत वाढली. त्यांचा समावेश बिलेनिअर्स क्लबमध्ये करण्यात आला होता.

राधाकिशन दमानी यांनी विक्रमी किंमतीला खरेदी केली प्रॉपर्टी

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डिमार्टचे प्रमुख राधाकिशन दमानी यांनी मुंबईत प्रॉपर्टीसाठी मोठी गुंतवणूक केली होती. एप्रिल 2021 मध्ये दमानी यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिलमध्ये एक बंगला 1001 कोटी रुपयांना खरेदी केला होता. तब्बल 5752.22 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळासाठी दमानी यांनी मोठी रक्कम मोजली होती. या डीलमध्ये प्रती चौरस फुटाचा भाव 1,61,670 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला होता. आजवरचा मुंबईतील रिअल इस्टेटमधला सर्वात महागडा आर्थिक व्यवहार ठरला होता. 

image source: zricks.com