जर तुम्ही नवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यावर तुमचे पैसे कसे वाचतील यासाठी जर काही टिप्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर नवीन लॅपटॉप खरेदी करताना जर पैसे वाचवायचे असतील तर त्यासाठी काही संशोधन, नियोजन आणि जाणकारांचा सल्ला आवश्यक आहे. तुमच्या नवीन लॅपटॉपवर चांगली डील मिळविण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स देत आहेत:
Table of contents [Show]
बजेट सेट करा
खरेदी सुरू करण्यापूर्वी तुमचे बजेट ठरवा. हे तुम्हाला तुमचे पर्याय कमी करण्यात आणि जास्त खर्च टाळण्यास मदत करेल. कारण जितका महाग लॅपटॉप तितके त्याचे जास्त फीचर्स हे समीकरण आहे. त्यामुळे तुमच्या आवश्यकता किती आणि कोणत्या हे आधी तपासून घ्या. त्यानुसारच कोणकोणत्या फीचर्सचा लॅपटॉप हवा हे ठरवता येईल.
किमतींची तुलना करा
ऑनलाइन लॅपटॉपचे वेगवेगळे मॉडेल शोधा आणि आसपासच्या किरकोळ दुकानांना भेट द्या. ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतींची तुलना करा. विशेष ऑफर, सवलत हे दुकानदार किंवा ऑनलाइन वेबसाईट देत आहेत का हे तपासण्यास विसरू नका.
लॅपटॉप बॅग, माऊस किंवा सॉफ्टवेअर यासारख्या ॲक्सेसरीजचा समावेश असलेल्या बंडल डील (Bundle Deal) शोधा. या बंडल डील तुमचे पैसे वाचवू शकेल.
ऑफर्सवर लक्ष ठेवा!
सध्या इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवर ऑफर्स दिल्या जातात. दिवाळी, दसरा, स्वातंत्र्य दिन अशा स्पेशल उत्सवांमध्ये मोठमोठे ब्रांड इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवर ऑफर्स देत असतात. या ऑफर्स चालू असताना तुम्ही जर खरेदी केली तर तुम्हांला तुमचे पैसे वाचवता येतील. त्यामुळे ऑफर्सवर लक्ष ठेवा.
तसेच तुम्ही जर विद्यार्थी असाल तर, लॅपटॉप उत्पादक किंवा किरकोळ विक्रेत्यांकडून काही विशेष विद्यार्थी सवलत किंवा डील्स आहेत का ते तपासा. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, डेल अशा अनेक कंपन्या विद्यार्थ्यांना सवलत देत असतात.
ओपन-बॉक्स डील आणि कॅशबॅक
ओपन-बॉक्स लॅपटॉप बहुतेकदा सवलतीत विकले जातात कारण ते डिस्प्लेसाठी ठेवलेले असतात. बऱ्याचदा ग्राहकांना मॉडेल दाखवण्यासाठी जे लॅपटॉप वापरतात त्यांना ओपन-बॉक्स लॅपटॉप म्हणतात. हे लॅपटॉप सुस्थितीत असतात आणि गॅरंटी व वॉरंटीसह दिले जातात. ही डील तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. खरेदी करण्यापूर्वी या लॅपटॉप स्थिती आणि वॉरंटी तपासा.
यासोबतच काही क्रेडिट कार्ड किंवा कॅशबॅक वेबसाइट विशिष्ट खरेदीवर सूट किंवा कॅशबॅक ऑफर करतात. तुम्ही अशा कोणत्याही ऑफरचा लाभ घेऊ शकता का ते देखील तपासा.
लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, खरेदी करत असलेल्या लॅपटॉपचे फीचर्स, गॅरंटी व वॉरंटीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेत आहात याची खात्री करण्यासाठी आयटी क्षेत्रातील जाणकारांची मदत देखील घ्या. त्यांनी दिलेला सल्ला तुम्हांला फायद्याचा ठरू शकतो.
अनावश्यक अतिरिक्त खर्चात अडकण्यापेक्षा तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या लॅपटॉपच्या फीचर्सवर आणि वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करा. जरा धीर धरून आणि थोडा अभ्यास करून, चार दुकाने आणि वेबसाईट फिरून, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणि गरजा पूर्ण करणारा लॅपटॉप नक्कीच शोधू शकता.