Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Lite: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी RBI ने वाढवली पैशांची मर्यादा, जाणून घ्या डीटेल्स

UPI Lite: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी RBI ने वाढवली पैशांची मर्यादा, जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये, रिझर्व्ह बँकेने UPI लाइट (UPI Lite) ही सेवा सुरु करण्याचे जाहीर केले होते. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने RBI ने हा एक उपक्रम सुरू केला आहे. ज्याद्वारे इंटरनेट सुविधा नसतानाही युजर्सला पेमेंट करता येणार आहे. सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यात होणाऱ्या व्यवहारावर मर्यादा आणल्या होत्या. मात्र आता यात बदल केले गेले आहेत.

500 रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार!

रिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.  ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभरातील डिजिटल पेमेंटच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ग्राहकांना यात जोडून घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे.

AI चा करणार वापर!

RBI ने येत्या काळात युपीआय पेमेंट संबंधी महत्वाचे बदल होणार असल्याचे देखील सूचित केले आहे. याबाबत UPI मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले आहे.

AI च्या माध्यमातून एकूण डिजिटल पेमेंट अनुभव ग्राहकांना सुखकर व्हावा, वापरकर्त्यांना सुधारित सुविधा प्रदान व्हावी हा हेतू असल्याचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.

UPI Lite द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा 200 वरून 500 रुपये वाढवण्याच्या निर्णयाचा हेतू मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या दैनंदिन छोट्या व्यवहारांसाठी UPI चा वापर करण्यास प्रोत्साहित करण्याचा आहे, असेही ते म्हणाले.

UPI Lite खात्यात 2,000 रुपये ठेवता येणार 

UPI Lite ही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ची साधारण अशी आवृत्ती आहे. इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असलेल्या नियमित UPI व्यवहारांच्या विपरीत, UPI Lite वापरकर्त्यांना 500 रुपयांपर्यंत ऑफलाइन पेमेंट करण्याची मुभा देते. हीच या UPI Lite ची खासियत आहे.

ही सुविधा ऑन-डिव्हाइस वॉलेट म्हणून कार्य करते. यामध्ये UPI पिनची आवश्यकता नसते आणि  रिअल-टाइम, किरकोळ व्यवहारांसाठी ही उपयुक्त ठरते. रिझर्व्ह बँकेने UPI Lite खात्यांसाठी कमाल शिल्लक मर्यादा 2,000 रुपये ठेवली आहे. म्हणजेच या ऑन-डिव्हाइस वॉलेटमध्ये तुम्ही 2000 रुपयांपर्यंत रक्कम ठेऊ शकतात आणि गरजेनुसार एका दिवसांत 500 रुपये खर्च करू शकता.