लॉकर्स असलेल्या ग्राहकांसोबत सुधारित करार करण्यासाठी बँकांना RBI ने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचे कारण मोठ्या संख्येने लॉकरधारक अद्यापही करू शकलेले नाहीत. यापूर्वी ही अंतिम मुदत 1 जानेवारी 2023 होती.मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. बर्याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही. आरबीआयने म्हटले आहे की, 30 एप्रिल 2023 पर्यंत बँकांना प्रत्येक लॉकरधारकाला माहिती द्यावी लागेल. 50% ग्राहकांनी 30 जून 2023 पर्यंत आणि 75% ग्राहक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुधारित करारावर स्वाक्षरी करतील याची देखील खात्री करावी लागेल.
बंद लॉकर तातडीने सुरू करण्याच्या सूचना
बँकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्या लागतील जसे की स्टॅम्प पेपरची तरतूद, कराराची इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणी, ई-स्टॅम्पिंग आणि ग्राहकाला कराराची प्रत वितरित करणे. याशिवाय 1 जानेवारी 2023 पर्यंत करार न झाल्याने बंद असलेले लॉकर्स तात्काळ कार्यान्वित करावेत. नवीन नियमानुसार काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी थेट बँकेची असेल आणि ग्राहकाला भरपाई द्यावी लागेल.
बँकेत खाते असणारा प्रत्येक ग्राहक लॉकरची सुविधा घेतोच असे नाही. पण काही ग्राहक ही सुविधा घेणे पसंत करतात. बरेचदा दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना हा महत्वाचा पर्याय वाटतो. असे ग्राहक बँकेकडून लॉकरचीही सुविधा घेत असतात. त्यासाठी बँकेसोबत करार करत असतात. या दृष्टीने ही महत्वाची बातमी आहे. यातून RBI कडून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.