Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Merger : मुंबईतील 'या' बँकेच्या सर्व शाखा पुण्याच्या कॉसमॉसमध्ये विलीन; आरबीआयची मंजुरी

Bank Merger : मुंबईतील 'या' बँकेच्या सर्व शाखा पुण्याच्या कॉसमॉसमध्ये विलीन; आरबीआयची मंजुरी

Image Source : www.sdcbank.ib.silsaas.co.in/www.cosmosbank.com

साहेबराव देशमुख या सहकारी बँकेच्या एकूण 11 शाखा आता कॉसमॉस सहकारी बँक म्हणून कार्यरत राहतील. बँकेच्या या विलिनीरणास कॉसमॉस बँकेच्या भागधारकांनी मार्च 2023 मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आरबीयने या बँकेच्या विलिनीकरणास मंजुरी दिली आहे.साहेबराव देशमुख को-ऑप बँकेच्या मुंबईत 10 शाखा आणि साताऱ्यात एक अशा एकूण 11 शाखा आहेत.

सहकारी बँकिंग क्षेत्रात नावाजलेल्या कॉसमॉस बँकेमध्ये (Cosmos Bank) आणखी एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे. मुंबईतील साहेबराव देशमुख सहकारी बँक(SDCB) या बँकेचे पुणे स्थित कॉसमॉस सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एसडीसी बँकेच्या सर्व खातेदारांना यापुढे कॉसमॉस बँकेची सुविधा प्राप्त होणार आहे. आरबीआयच्या मंजुरीनंतर  26 सप्टेंबर 2023 पासून या विलिनीकरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एसडीसीबीची ओळख आता कॉसमॉस बँक-

पुणेस्थित कॉसमॉस सहकारी बँकेने मुंबईमधील साहेबराव देशमुख सहकारी बँकेचे (Sahebrao Deshmukh co-op Bank) अधिग्रहण केले आहे. त्यानुसार आता साहेबराव देशमुख या सहकारी बँकेच्या एकूण 11 शाखा आता कॉसमॉस सहकारी बँक म्हणून कार्यरत राहतील बँकेच्या या विलिनीकरणास कॉसमॉस बँकेच्या भागधारकांनी मार्च 2023 मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आरबीआयने या बँकेच्या विलिनीकरणास मंजुरी दिली आहे. साहेबराव देशमुख को-ऑप बँकेच्या मुंबईत 10 शाखा आणि साताऱ्यात एक अशा  एकूण 11 शाखा आहेत. तसेच बँकेचा एकूण 244 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. एसडीसी बँकेचे विलिनीकरण हे ऐच्छिक असून या निर्णयामुळे खातेदारांच्या 143.40 कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे.

कॉसमॉस बँकेच्या 159 शाखा

बँकेच्या विलिनीकरणामुळे पुण्यातील कॉसमॉसबँकेचा मुंबईत देखील मोठा शाखा विस्तार झाला आहे. मुंबईत आता कॉसमॉस बँकेच्या 50 शाखा झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या आता देशभरात एकूण  सात राज्यांमध्ये 159 शाखा झाल्या असून ही संख्या 200 पर्यंत वाढवण्याचे बँकेचे उदिष्ट आहे. कॉसमॉस बँकेने आतापर्यंत एकूण 16 सहकारी बँकांचे अधिग्रहण केले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय हा मार्च 2023 पर्यंत 30,745 कोटीवर पोहोचला आहे.FY23मध्ये बँकेने 213 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेची भांडवलाची स्थिती मजबूत आहे.

एसडीसीबीच्या खातेधारकांसाठी

साहेबराव देशमुख बँकेच्या ऐच्छिक विलिनीकरणाला आरबीआयने मंजुरी दिल्यानंतर आता एसडीसीबीच्या सर्व खातेधारांना कॉसमॉस बँकेच्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे या बँकेच्या खातेधारकांनी आपल्या शाखेत जाऊन नवीन पासबूक, चेकबूक बदलून घेणे आवश्यक आहे. तसेच कॉसमॉस बँकेच्या विविध योजना, व्याजदर, मुदत ठेवी या संदर्भातील माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.