Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच बँकांवर आरबीआयची कारवाई

RBI Action Against Five Banks

Image Source : www.realestatetimes.in

RBI Action Against Five Banks: नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पाच बँकेचा परवाना रद्द केला आहे. RBI ने म्हटले आहे की, प्रत्येक ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून विमा दाव्याअंतर्गत 5 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या ठेवी प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

RBI: नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पाच बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परवाना रद्द केल्यामुळे बुधवारी संध्याकाळपासून बँक व्यवसाय करू शकणार नाही. तसेच प्रत्येक ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून विमा दाव्याअंतर्गत 5 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच्या ठेवी प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

DICGC द्वारे उतरवला जातो विमा

बँकांमध्ये जमा केलेल्या प्रत्येक खातेदाराच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा DICGC द्वारे विमा उतरवला जातो. व्यापारी बँका, स्थानिक क्षेत्र बँका, प्रादेशिक आणि सहकारी बँकांसह सर्व बँकांच्या ठेवी DICGC च्या विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. चालू आर्थिक वर्षात आरबीआयने आतापर्यंत पाच सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत.

पाच बँकांचे परवाने केले रद्द

चालू आर्थिक वर्षात आरबीआयने आतापर्यंत पाच सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. जुलै महिन्यातच पाचही बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी 11 जुलै रोजी मध्यवर्ती बँकेने कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा येथील हरिहरेश्वर बँकेवर कारवाई केली होती.

दुसरीकडे, 5 जुलैपासून बुलढाणास्थित मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि बेंगळुरूस्थित सुश्रुती सौहार्द सहकार बँक नियमित यांचे बँकिंग परवाने रद्द करण्यात आले. यूपीची सहकारी बँक युनायटेड इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना देखील आरबीआयने रद्द केला आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आणि उत्पन्नाची क्षमता कमी असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.