Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Railway Electrification: भारतीय रेल्वे 100% विद्युतीकरणाच्या दिशेने सुसाट, 83% काम पूर्ण झाल्याचा दावा

Railway Electrification

Railway Electrification: भारतीय रेल्वेने 100% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेचे इंधन आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार असून रेल्वे अधिक वेगवान होणार आहे.

देशातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली भारतीय रेल्वे कात टाकत आहे. रेल्वेने पर्यावरणपूरक, गतिमान आणि इंधन कार्यक्षम होण्याच्या दिशेने वेगाने कूच केली आहे. रेल्वेने 100% विद्युतीकरणाचे टार्गेट ठेवले असून त्यापैकी 83% पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केल्याने इंधन आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार असून रेल्वेचा स्पीड देखील वाढणार आहे.

आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये रेल्वेने 1973 किमी लांबीच्या रेल्वेमार्गांचे (2647 TKM) विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष 2021-2022 च्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिफिकेशन 41% अधिक प्रमाणात पूर्ण केले आहे. ज्यात 1161 आणि 296 किमी लांबीचे दुहेरी मार्गांचे आणि सायडिंग ट्रॅकचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे.2022 मध्ये 4100 TKM पूर्णपणे इलेक्ट्रि्फाईड झाली आहे.

रेल्वेने 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे (Zero Carbon Emissions by 2030) उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वेगाने रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वे (NCR) ईस्ट कोस्ट रेल्वे (ECOR), साऊथ इस्टर्न रेल्वे (SER), वेस्ट सेंट्रल रेल्वे (WCR) आणि ईस्टर्न रेल्वे (ER) या पाचही झोनमध्ये 100% इलेक्ट्रिफिकेशन झाले असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दर्शना जारदोश यांनी सांगितले. राज्यांचा विचार केला तर उत्तराखंडमधील सर्वच रेल्वे मार्गांचा पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.  

रेल्वेच्या विद्युतीकरणाचे फायदे (Benefit's of Electrification on Railway's)

  1. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे.यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चाची बचत होईल. शिवाय प्रदूषण कमी करणे शक्य होईल.
  2. सरासरी 100 किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले तर किमान 40 दशलक्ष लिटर डिझेलची बचत होईल. यामुळे रेलवेचे 2500 कोटी वाचू शकतात.
  3. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाल्यास मालवाहू क्षमता वाढू शकते. तसेच या मार्गांवर जास्त डब्ब्याच्या चालवणे शक्य आहे.दोन लोकोमोटीव्ह इंजिनासह गुड्स ट्रेन काही ठिकाणी चालवल्या जात आहेत.
  4. विद्युतीकरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सुकर जाणार आहे. ज्यामुळे रेल्वेच्या दैनंदिन खर्चात देखील मोठी बचत होणार आहे.
  5. इलेक्ट्रिक इंजिनामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होईल. वन परिक्षेत्रातून जाताना तेथील जैवविविधतेवर फार मोठा परिणाम  होणार नाही.