Indian Railway: भारतीय रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांना चाप बसावा आणि त्यांना अद्दल घडावी म्हणून वेळोवेळी कारवाई केली जाते. तसेच याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठीही रेल्वे प्रशासन काम करते. पण तरीही डिसेंबर, 2022 मध्ये एकट्या पुण्यातून रेल्वेने 18,234 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल 1.38 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
पुणे रेल्वे डिव्हिजनने (Pune Railway Division) हाती घेतलेल्या या कारवाईत पुणे रेल्वे प्रशासनाने विदाऊट तिकिट प्रवास करणाऱ्या सुमारे 18,234 जणांवर कारवाई केली. या कारवाईत पुणे रेल्वे प्रशासनाने काही फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. तर काहींची रवानगी तुरूंगात केली. याचबरोबर चुकीच्या पद्धतीने प्रवास करणाऱ्यांवरही प्रशासनाने धडक कारवाई राबवली. या धडक कारवाईत 5,434 यात्री हे चुकीच्या पद्धतीने किंवा रेल्वेने घालून दिलेल्या नियमांना डावलून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 31.31 लाख रुपयांचा दंड वसुल केला.
एप्रिल ते डिसेंबर 2.56 लाख प्रवाशांवर कारवाई!
पुणे रेल्वे डिव्हिजनच्या तपासणी टीममधील काही अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर, 2022 या कालावधीत एकूण 2.56 लाख प्रवाशांना बिना तिकिट प्रवास केल्याबद्दल पकडले होते. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून 18.34 कोटी रुपये जमा झाले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे पोलिस आणि तपासणी अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई सुरू आहे. सतत तपासणी होत असल्यामुळे फुकट्यां प्रवाशांकडून रेल्वेला दंडाच्या स्वरूपात चांगला महसूल मिळत आहे. पण त्याचबरोबर रेल्वेचे नुकसान ही होत आहे. जे प्रवाशांना पकडले जात आहे. त्यांच्याकडून वसुली करता येते. पण जे पकडले जात नाही. त्यांच्याकडून मात्र रेल्वेचे नुकसानच होत आहे. या कारवाईत रेल्वे प्रशासनाने 266 अशा प्रवाशांवर कारवाई केली. ज्यांच्याकडे नियमापेक्षा अधिक सामान होते. अशा प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 31 हजार रुपये दंडाच्या रूपात वसुल करण्यात आले.
फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेचे नुकसान!
बिना तिकिट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. कारण रेल्वेला सध्या तिकिटांच्या माध्यमातून उत्पन्न मिळत आहे. खासकरून प्रवाशी रेल्वेचा उत्पन्नाचा स्त्रोत हा फक्त तिकिट विक्री हाच आहे. प्रवासी हा स्त्रोतच डावलून रेल्वेमधून फुकट प्रवास करत असतील तर त्याने थेट रेल्वेचे नुकसान होते. त्याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासन अशा फुकटेगिरीला आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम राबवत असते.
रेल्वेची कमाई किती होते?
रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, रेल्वेने गेल्या वर्षात 1,04,040 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर यावर्षी 1,20,478 कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेची तिकिट विक्रीत 16 टक्क्यांनी वाढ झाली.