Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Prices: पुणे, मुंबईसह 7 मेट्रो शहरातील मालमत्तांचे दर आणि भाडेवाढ जाणून घ्या?

Property Prices

पुणे मुंबईसह देशातील प्रमुख 7 मेट्रो शहरांतील मालमत्तांचे दर मागील काही वर्षांमध्ये वाढले आहेत. मुंबई, पुणे शहरांतील दर सर्वात जास्त आहेत. मागील पाच वर्षांचा विचार करता बंगळुरु आणि हैदराबाद शहरातील दरवाढ सर्वाधिक झाली. पुण्यामध्ये मागील वर्षी सरासरी प्रति स्केअर फूट मालमत्तेचा दर 6 हजार रुपये होता.

Property Prices Pune: पुणे मुंबईसह देशातील प्रमुख 7 मेट्रो शहरांतील मालमत्तांचे दर मागील काही वर्षांमध्ये वाढले आहेत. मुंबई, पुण्यातील मालमत्तांचे दर सर्वात जास्त आहेत. मागील पाच वर्षांचा विचार करता बंगळुरु आणि हैदराबाद शहरातील मालमत्तांच्या दरवाढीचा वेग सर्वाधिक आहे. कोरोनाकाळात रोडावलेली मागणी आता पूर्वपदावर आली आहे.  Anarock Research ने याबाबत अभ्यास करून आकडेवारी सादर केली आहे.

पुण्यामध्ये मागील वर्षात सरासरी प्रति स्केअर फूट मालमत्तेचा दर 6 हजार रुपये इतके होता. मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरु या सातही शहरात मागील पाच वर्षात घरभाडे आणि जागेचे प्रति स्केअर फूट दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (Property Prices Mumbai) तसेच घरांची मागणीही या मोठ्या शहरांमध्ये वाढत आहे. या सातही शहरांचा विचार करता प्रति स्केअर फूट सरासरी जागेची किंमत 6150 एवढी आहे. 

सात मेट्रो शहरांतील मालमत्तांचे सरासरी प्रति स्केअर फूट दर

residential-building.jpg

2022 वर्षात या सात शहरांमध्ये सरासरी 6% दरवाढ झाली. तर 2022 पूर्वीच्या चार वर्षांचा विचार करता प्रतिवर्ष 3 ते 4% दराने मालमत्तांचे भाव वाढले. कोरोनानंतर अचानक दरवाढ पाहायला मिळाली. कोरोनापूर्वी घरांची मागणीही रोडावली होती. मात्र, कोविडनंतर अचानक मागणी वाढली.

बंगळुरु आणि हैदराबाद शहरांमध्ये मागील पाच वर्षात सरासरी 10% दराने जागेच्या मालमत्तेचे दर वाढले आहेत. (Property Prices in Metro city) बंगळुरुमध्ये 2018 साली मालमत्तेचा सरासरी दर 4,894 रुपये प्रति स्केअर फूट इतका आहे. त्यात वाढ होऊन 2022 साली 5,570 प्रति स्केअर फूट इतका झाला. तर हैदराबादमध्ये 2018 साली मालमत्तेचा सरासरी दर 4,128 रुपये प्रति स्केअर फूट इतका आहे. त्यात वाढ होऊन 2022 साली 4,620 प्रति स्केअर फूट इतका झाला आहे.

कोरोनामुळे भाडेवाढ काही काळ थांबली होती. मात्र, आता पुन्हा रहिवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे भाडे वाढले आहे. चालू वर्षातही भाडे आणि मालमत्तांचे प्रति स्केअर फूट दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर वाढ करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागांचे घर खरेदी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदीची डिमांड आणखी वाढू शकते.