Drone Acharya AI IPO: पुण्यातील ड्रोन कंपनी ड्रोन आचार्य एरिअल इनेव्हेशन या कंपनीचा आयपीओ मंगळवारी (दि.13 डिसेंबर) गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 13 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. ड्रोन आचार्य कंपनीने आयपीओची प्राईस ब्रॅण्ड 52-54 रुपये प्रति शेअर अशी निश्चित केली आहे. कंपनी आयपीओ (Initial Public Offering- IPO)द्वारे नवीन इक्विटी शेअर्स आणत असून यातून कंपनीने 34 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा संकल्प सोडला आहे.
ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन आयपीओ!
ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन आयपीओ 13 ते 15 डिसेंबर, 2022 या दरम्यान गुंतवणुकीसाठी ओपन असणार आहे. याची प्राईस ब्रॅण्ड 52 ते 54 रुपये प्रति शेअर अशी आहे. तसेच याच्या एका लॉटमध्ये 2 हजार शेअर्स असणार आहेत. यामध्ये 62,90,000 फ्रेश इश्यू असून त्याची किंमत 33.97 कोटी रुपये आहे. हा शेअर बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर लिस्टिंग होणार असून, तो 23 डिसेंबरला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. तर 20 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना शेअरचे अलॉटमेंट होईल.
ग्रे मार्केटमध्ये ड्रोन आचार्यचा भाव काय सुरू आहे?
ग्रे मार्केटमध्ये ड्रोन आचार्य कंपनीचा भाव सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकते, असे मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये ड्रोन आचार्यचा इश्यू 60 रुपये प्रीमिअमवर आहे. 5 डिसेंबरला ग्रे मार्केटमध्ये याचा भाव 25 रुपये होता. त्यानंतर तो 45 झाला आणि त्याच्या एक दिवस आधी 50 रुपये होता. ग्रे मार्केटमधील या प्रीमिअममुळे शेअर मार्केटमधी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ड्रोन आचार्यचे लिस्टिंग चांगले होईल, असे म्हणणे आहे.
ड्रोन आचार्य कंपनी काय करते?
Drone Acharya AI मल्टी सेन्सर ड्रोन सर्व्हेक्षणासाठी वापरली जाणारी ड्रोन सोल्युशन इकोसिस्टम आहे. या कंपनीली नागरी उड्डाण महासंचालनालयाद्रे रिमोट पायलट प्रशिक्षण संघटना (RPTO) अंतर्गत ड्रोन प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मार्च, 2022 पासून ड्रोन आचार्य कंपनीने 180हून अधिक ड्रोन पायलटांना प्रशिक्षण दिले आहे.
स्टार्टअपद्वारे सुरू करण्यात आलेली ही कंपनी ड्रोनचा वापर, ड्रोन सेन्सर आणि प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चरची खरेदी आणि निर्मिती करण्याच्या क्षेत्रातही उतरणार आहे. याशिवाय कंपनी मार्च, 2023 पर्यंत नवीन 12 प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. ड्रोन आचार्यने प्री-सीड फंडिंग राऊंडमध्ये यावर्षी मे महिन्यात 4.6 मिलिअन डॉलर जमा केले होते. ड्रोन आचार्य कंपनीला 71.56 टक्के महसूल हा एकट्या महाराष्ट्रातील ग्राहकांकडून मिळत आहे.