Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PSU Banks Share Rise: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी

PSU Bank Share Rally

PSU Banks Share Rise: आज शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. मात्र आजच्या पडझडीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली.

आज बुधवारी 21 डिसेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 635 अंकांनी आणि निफ्टी 186 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला. मात्र आजच्या पडझडीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली. UCO Bank, इंडियन ओव्हरसिज बँक हे शेअर तेजीसह बंद झाले.

आज सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीची वाट धरली होती. सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला होता, मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दुपारनंतर बाजारात विक्रीचा जोर वाढला आणि निर्देशांकांत घसरण सुरु झाली. तत्पूर्वी सकाळ पहिल्या तासांस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून आली. UCO Bank 8.65%, इंडियन ओव्हरसीज बँक 6.32%, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5.30%, बँक ऑफ इंडिया 3.95%, युनियन बँक ऑफ इंडिया 2.44%, बँक ऑफ महाराष्ट्र 2.13% आणि आयडीबीआय बँक 1.34% ने वधारले होते.

बाजारात इतर मोठ्या बँकांच्या शेअर्सला मात्र विक्रीचा फटका बसला. एसबीआयचा शेअर 1.85% नी घसरला आणि तो 593.40 रुपयांवर बंद झाला. आणखी एक सेन्सेक्समधील हेवीवेट स्टॉक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज 0.86% घसरण झाली. तो 14.10 रुपयांच्या घसरणीसह 1617.35 रुपयांवर बंद झाला. ICICI बँकेचा शेअर 1.88% ने घसरला. अॅक्सिस बँक 1.86%, बंधन बँक 0.14% , कोटक महिंद्रा बँक 1.82% ने घसरले.

पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये मागील आठवडाभरापासून तेजीची लाट आहे. यात बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अॅंड सिंध बँक आणि युको बँक या शेअरमध्ये मागील आठवड्यात 50% पर्यंत वाढ झाली आहे.