Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Rule: शेत जमिनीवर बांधकाम करता येते का? नियम काय सांगतो?

Property Rule

Property Rule: हल्ली शहरांमध्ये ऐसपैस जागा उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकजण छोट्या शहरात किंवा गावाकडे शेतजमिनीवर घरे बांधण्याचा विचार करतात. मात्र शेतजमिनीवर मालमत्तेचे बांधकाम करता येते का? याबाबत नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.

घर बांधण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. ऐसपैस जागा असेल, तर त्या जागेवर टुमदार घर बांधता येऊ शकते. त्यामुळेच बरेच जण शेत जमिनीवर बांधकाम करताना पाहायला मिळतात. जिथे त्यांना मोठी जागा आणि इतर सोयी सुविधा देखील मिळतात. आजच्या घडीला अनेक बिल्डर शेतजमिनीवर उंचच्या उंच बिल्डींग बांधतात. त्यामधील फ्लॅटची विक्री करून अमाप पैसे कमावता. पण अशी घरे अनधिकृत प्रकारात मोडतात. जर तुम्हीही शेत जमिनीवर घर बांधण्याचा विचार करत असाल, किंवा शेतजमिनीवरील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नियम काय सांगतो, जाणून घेणे गरजेचे आहे. 

नियम काय सांगतो?

शेतजमीन म्हणजे अशी जमीन ज्यावर शेतकरी वेगवेगळी पिके घेतो. किंवा जनावरे अशा ठिकाणी चारा चरण्यासाठी जातात. या जमिनीवर पिके घेऊन शेतकरी घरचा उदरनिर्वाह चालवतो किंवा ज्यातून त्याला उत्पन्न मिळते. अशा जमिनीवर बांधकाम करता येत नाही. जर बांधकाम करायचे असल्यास या जमिनीचे हस्तांतरण करावे लागते.

शेतजमिनीवर घर, कारखाने, उद्योग उभारण्यासाठी कायद्याने परवानगी नाही. शेतजमिनीचे अकृषिक जमिनीत रूपांतर केल्यानंतरच त्या जमिनीवर बांधकाम करता येते. निवासी उद्देशाच्या हेतूने मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जमीन बिगरशेती असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. जर ती जमीन सुरुवातीला शेतीसाठी वापरली जात असेल, तर तिचे रूपांतर बिगरशेत जमिनीत करावे लागणार आहेत.

शेती हा राज्याशी निगडित विषय असल्याने, जमीन हस्तांतरणासाठी विविध राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. त्यासाठी सुरुवातीला धर्मांतराचे कारण सांगणारा अर्ज जमीन महसूल विभागाच्या आयुक्तांकडे पाठवावा लागेल. जेव्हा शेतजमिनीचे अकृषिक जमिनीत रूपांतर केले जाते, तेव्हा मालमत्ता आणि त्याच्या परिसरानुसार अनिवार्य शुल्क जमीन मालकाला भरावे लागते.

जमीन हस्तांतरणासाठी 'या' कागदपत्रांची आवश्यकता आहे

जर तुम्हाला कृषी जमीन अकृषी जमिनीमध्ये हस्तांतरित करायची असेल, तर तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. ज्यामध्ये जमिनीचे कागदपत्र, उत्पन्नाची माहिती देणारे कागदपत्र,सेल डिड आणि म्युटेशन डिड तसेच जर जमीन भेट स्वरूपात मिळाली असेल, तर त्याचे दस्ताऐवज गरजेचे आहेत. याशिवाय नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीची एनओसी (NOC) देखील गरजेची आहे. जमीन हस्तांतरणासाठी जमिनीचे संपूर्ण तपशील माहीत असणे गरजेचे आहे.

Source: hindi.moneycontrol.com