• 24 Sep, 2023 01:56

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनातून सावरले, मुंबईतील मालमत्ता खरेदी वाढली

property sale in mumbai

Property Sale in Mumbai Rise: मुंबई शहरात एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीत 26,150 प्रॉपर्टींची विक्री झाली. राष्ट्रीय पातळीवरील विक्रीच्या आकडेवारीत 35 टक्क्यांचा सर्वाधिक वाटा आहे. मालमत्ता खरेदीचे मोठे व्यवहार ठाणे पश्चिम,डोंबिवली, वसई,पनवेल आणि कल्याण अशा परिसरांमध्ये झाल्याचे या अहवालात दिसून आले.

Property Sale rise in Mumbai: मुंबईतील मालमत्तांचा नवीन पुरवठा आणि खरेदीमध्ये एप्रिल आणि जून २०२२ मध्ये ४२ टक्के आणि १२ टक्के वाढ झाल्याचे ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम अहवालात दिसून आले आहे. निवासी मालमत्तांच्या खरेदीबाबत ग्राहक सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील रिअल इस्टेट क्षेत्र कोरोना संकटातून सावरल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते.

मुंबई शहरात एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीत 26,150 प्रॉपर्टींची विक्री झाली. राष्ट्रीय पातळीवरील विक्रीच्या आकडेवारीत 35 टक्क्यांचा सर्वाधिक वाटा आहे. विक्रीचे मोठ्या प्रमाणावरील व्यवहार ठाणे पश्चिम,डोंबिवली, वसई,पनवेल आणि कल्याण अशा परिसरांमध्ये झाल्याचे या अहवालात दिसून आले.

हाऊसिंग डॉटकॉम आणि नारडेको या उद्योगातील संस्थेने केलेल्या संयुक्त अहवालात भाग घेतलेल्या मुंबईतील 42% संभाव्य घर खरेदीदारांनी रिअल इस्टेटला त्यांचा प्राधान्याचा मालमत्ता वर्ग म्हणून गुण दिले.या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की,अनेक ग्राहकांना मालमत्तेच्या किंमती वाढणे अपेक्षित आहे आणि त्यांच्या घर खरेदीच्या योजना अंतिम करण्यासाठी लवचिक पेमेंट योजना आणि सवलतीच्या ऑफर्सची गरज असते.

1 ते 3 कोटी रुपयांच्या परिघात असलेल्या मालमत्तांना कमाल (28%) मागणी असल्याचे मुंबईत दिसून आले. या वर्गातील सर्वाधिक विक्री ठाणे पश्चिममध्ये झाली. घर खरेदीदारांमध्ये 1 बीएचकेला सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. मुंबईतील एकूण विक्रीमध्ये 53% सर्वाधिक वाटा उचलला आहे. मालमत्तेच्या किंमती वाढत असतानाही भारताच्या आर्थिक राजधानीतील ग्राहकांच्या भावना आशावादी आहेत. मागील काही महिन्यांत गृहकर्जावरील व्याजदरात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु 2019 मध्ये असलेल्या दरापेक्षा ते बरेच कमी आहेत. जागतिक साथीमुळे घरून काम करण्याला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे अनेक घर खरेदीदार घर आणि कार्यालय अशा दोन्ही प्रकारे काम करू शकतील अशा मालमत्तांचा विचार करू लागले आहेत.

मुंबईचा तिमाही निवासी घर विक्रीचे आकारमान त्याच्या कोविड पूर्व पातळीच्या जवळ म्हणजे  95% पर्यंत आला आहे. एप्रिल-जून तिमाहीत 12% वाढ झाल्यानंतर हे शहर आपला विक्रीचा वेग कायम ठेवत आहे. त्यांना जुलै 2022 मध्ये मालमत्तांच्या नोंदणीत सुदृढ 15% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईसाठीचा दृष्टीकोन शाश्वत अंतिम वापरकर्ता मागणीमुळे सकारात्मक राहिला आहे. परिघावरील परिसर जसे ठाणे पश्चिम, कल्याण- डोंबिवली आणि वसई-विरार ही क्षेत्र मालमत्ता बाजाराला चालना देतील, असे बोलले जाते. एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीत एकूण 43,220 घरे बाजारात  उपलब्ध झाली होती. त्यात 42% वाढ झाली. यातील अनेक नवीन युनिट्स ठाणे पश्चिम, डोंबिवली आणि बोरिवली अशा सूक्ष्म बाजारपेठांमध्ये आणण्यात आली.

शिल्लक घरांचा साठा कमी झाला (इन्व्हेंटरी ओव्हरहँग) 

अहवालानुसार सर्वोच्च 8 शहरांमधील न विक्री झालेल्या (शिल्लक घरे) एकूण 7.37 लाख घरांपैकी 36% घरे मुंबईत आहेत. मुंबई भारतातील 8 महत्त्वाच्या निवासी बाजारपेठांमध्ये विकल्या न गेलेल्या सर्वाधिक साठ्यावर असली तरी मालमत्तांची मागणी वाढू लागल्यामुळे मुंबईतील इन्व्हेंटरी ओव्हरहँग कमी झाला आहे. तो मागील वर्षाच्या याच कालावधीत 64% होता आणि 2022 मधील दुसऱ्या तिमाहीत 38 महिन्यांपर्यंत आला आहे. अंदाजित कालावधीतील इन्व्हेंटरी ओव्हरहँग विकासक बाजारातील न विकली गेलेली घरे सध्याच्या किंमतीत विकण्यास काढतात.