हल्ली अनेकजण गृहकर्जाच्या मदतीने स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करत आहेत. बँका ग्राहकांना त्यांच्या निश्चित वार्षिक उत्पन्नावर गृहकर्ज उपलब्ध करून देतात. घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणावी लागेल. अर्जदाराचा सिबील स्कोर उत्तम असेल, तर बँका कमी वेळेत अर्जदाराला कर्ज उपलब्ध करून देतात. गृहकर्ज हे दिर्घमुदतीचे कर्ज म्हणून ओळखले जाते. दिर्घमुदतीच्या या कर्जावर जितका कमी व्याजदर तितके जलद कर्ज फेडण्यासाठी मदत होते. आपल्यापैकी अनेकांचा असा ग्रह आहे की, सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये देखील कमी व्याजदरात गृहकर्जाची पूर्तता केली जाते. आज आम्ही तुम्हाला खाजगी क्षेत्रातील कोणत्या बँका गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर देतात, त्याबद्दल माहिती देणार आहोत.
Table of contents [Show]
इंडसइंड बँक (Indusind Bank)
इंडसइंड बँक गृहकर्जावर 8.5 टक्क्यांपासून व्याजदर उपलब्द करून देते. ही बँक जास्तीत जास्त 9.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध करून देत आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने 25 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले असेल, तर 8.5 टक्के व्याजदरानुसार त्याचा मासिक हप्ता 21,696 रुपये असणार आहे.
कोटक महिंद्रा बँक ( Kotak Mahindra Bank)
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर 8.75 टक्के व्याजदर उपलब्ध करून देत आहे. तर जास्तीत जास्त 9.60 टक्के व्याजदर आकारले जात आहे. या बँकेमध्ये 25 लाखांचे कर्ज 20 वर्षासाठी 8.75 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मासिक 22,093 रुपये असणार आहे.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. या बँकेचे गृहकर्ज 8.45 टक्क्यांपासून सुरू होत असून 9.85 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. 25 लाखांचे कर्ज 20 वर्षासाठी 8.45 टक्के व्याजावर घेतले, तर ग्राहकांना मासिक 21,617 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
इंडियन बँक (Indian Bank)
खासगी क्षेत्रातील इंडियन बँक ग्राहकांना 8.5 टक्क्यांपासून व्याजदर ऑफर करत आहे. जास्तीत जास्त 9.9 टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या बँकेतून ग्राहकांनी 25 लाखांचे कर्ज 20 वर्षासाठी घेतले, तर 8.5 टक्के व्याजावर मासिक 21,696 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra)
बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. या बँकेत 8.6 टक्क्यांपासून गृहकर्जाचे व्याजदर सुरू होत असून 10.3 टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या बँकेतून 25 लाखांचे कर्ज 20 वर्षासाठी 8.6 टक्के व्याजानुसार घेतले, तर मासिक 21,854 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.