जागतिक पातळीवर टेक उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत या काळात तुम्ही कधी 15,000 रुपयांचा लॅपटॉप पाहिला आहे का? जे Android प्रमाणे काम करते आणि लॅपटॉपचा वापराचा अनुभव देते! आयआयटी दिल्लीच्या प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी अश्याच उपकरणाची निर्मिती केली आहे. ते प्राइमबुक नावाचे लॅपटॉप घेऊन आले आहेत. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी लॅपटॉप उपलब्ध होऊ शकेल. जाणून घेऊया या लॅपटॉपमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत.
आयआयटी दिल्ली येथे निर्माते चित्रांशु यांचा प्रवास 2015 मध्ये सुरू झाला. जेव्हा ते आणि त्यांचे सह-संस्थापक अमन वर्मा आयआयटी दिल्लीच्या अंतिम वर्षात होते. यामुळे ते एनएसएसशी संबंधित असल्यामुळे मुलांना शिकवायला जात असत. कधीकाळी ते सोबत लॅपटॉप देखील नेत असत. यावेळी त्यांच्या लक्षात आले की मुलांसाठी शिक्षणात लॅपटॉप आवश्यक आहे. असाइनमेंट करणे, नोट्स बनवणे, गुगल सर्च, गृहपाठ, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, अशा कामांसाठी लॅपटॉप हे आवश्यक साधन आहे. मात्र बरीच मुले आर्थिक परिस्थितीमुळे लॅपटॉप खरेदी करू शकत नाही. म्हणून त्यांनी वाजवी किमतीत लॅपटॉप तयार करून विक्री करण्याचे ठरवले.
प्राइम बुकचे दोन मॉडेल (Two models of prime books)
सध्या या लॅपटॉपचे दोन मॉडेल्स आहेत. प्राईम बुक लाइट, रॉकचिप प्रोसेसरद्वारे समर्थित, वाय-फाय, बी2बी आणि प्राइमबुक 4जी, सिमवर देखील चालते. 10 मार्चपासून हे लॅपटॉप बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 11.6 इंच स्क्रीन, HD IPS पॅनेल, रबर कोटेड बॉडी, 2 USB 3.0 पोर्ट, मिनी HDMI पोर्ट आणि 2 MP कॅमेरा व फूल साईज किबोर्ड देण्यात आला आहे. सिमकार्डच्या साह्यानेही कॉलिंग करता येईल.
स्पर्धेची भीती नाही (No fear of competition)
कंपनीला स्पर्धेची भीती नाही कारण ते म्हणतात की आजपर्यंत सुमारे 23 कोटी मुलांकडे संगणक नाही. क्रोमबुकच्या स्पर्धेला ते घाबरत नाहीत कारण त्यांच्याकडे अँड्रॉइड आधारित ओएस आहे. त्यांचे लक्ष भारतीय अॅप इकोसिस्टमवर आहे. प्राइमबुकचे स्वतःचे अॅप स्टोअर आहे. यात 50 हजारांहून अधिक अॅप्स आहेत. ते म्हणतात "आम्ही देसी, मेड इन इंडिया सोल्यूशन दिले आहे. आम्ही फक्त विद्यार्थी आहोत. आम्हाला मुलांना त्यांच्या अभ्यासात गुंतण्यासाठी उपयुक्त अॅप्स द्यायचे आहेत. इयत्ता 1 पासून. आम्ही 12वी पर्यंतच्या अभ्यासासाठी आवश्यक सामग्री देण्याचा त्यांचा मानस आहे. कंपनीचा नोएडा येथे कारखाना आहे. ते दरमहा 50 हजार लपटॉप्सची निर्मिती करतील असा त्यांचा दावा आहे.