Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पंतप्रधान जन आरोग्य योजना, 5 लाख रूपयांपर्यंत कॅशलेस उपचार

पंतप्रधान जन आरोग्य योजना, 5 लाख रूपयांपर्यंत कॅशलेस उपचार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रत्येक वर्षी मिळणार आरोग्य विमा संरक्षण

ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबे आरोग्य विमा नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने ते हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. काहीवेळेस त्यांना कर्ज काढून उपचार करावे लागतातय. जनसामान्यांची ही परवड थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली. या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रत्येक वर्षी 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचे संरक्षण मिळते.

केंद्र सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ((Aayushyman Bharat Pradhanmantri Jan Aarogya Yojana) जाहीर केली. या योजनेत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या 3 दिवस आधी आणि उपचारानंतर 15 दिवसांपर्यंतचे आरोग्य उपचार आणि औषधे तसेच निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, जेवण आणि प्रवासाचा खर्च देखील मिळण्याची तरतूद आहे. कुटंबात लहान किंवा मोठ्या कितीही व्यक्ती असल्या तरी योजनेचा लाभ तितकाच मिळतो. आधीपासून अस्तित्वात असलेल्या रूग्णांनाही पहिल्या दिवसापासून या योजने अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील 74.3 लाख कुटुंबांनी योजनेची कार्ड तयार करून घेतली आहेत.

कोणत्या वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार आणि 183 फॉलोअप आरोग्य सेवांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, डोळे, स्त्रियांचे आजार, हृदय (हार्ट), पोट, आतड्यांशी संबंधित आजार, मुलांचे आजार, मेंदूशू संबंधित शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, प्लास्टिक सर्जरी, त्वचेचे आजार, फुप्फुसाचे आजार, कॅन्सर आणि मानसिक आजार या उपचारांचा लाभ घेता येईल.
उपचारादरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यास, मृतदेह संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत नेण्याची खर्चही यात आहे.

योजनेचा लाभ कुणाला?

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये ज्या कुटुंबांची नावे यादीत आहेत. ते या योजनेसाठी पात्र आहेत. 
ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींचे राहणीमान, उत्पन्न आणि इतर घटकांवर अवलंबून आहे. तर शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यवसायावर आधारित आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबातील प्रत्येकाकडे स्वत:चे आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
गोल्डन कार्ड असणारी व्यक्ती देशात कुठल्याही राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकते.

असा घेऊ शकता योजनेचा लाभ

जन आरोग्य योजनेची सर्व माहिती https://pmjay.gov.in या वेबसाईटवर मिळेल.
योजनेचा लाभ घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.
स्मार्टफोनद्वारे www.mera.pmjay.gov.in या वेबसाईटवरून तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता. तसेच हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य मित्राच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचे नाव यादीत आहे का? तपासू शकता.