Maruti Suzuki INVICTO Launched Next Month: मारुती सुझुकीने गेल्या काही दिवसांआधीच जिमनी लाँच केली आणि आता मारुती सुझुकीने INVICTO चे बुकिंग सुरू केले आहे. मारुती आपले सर्वात प्रीमियम युटिलिटी वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी जुलै महिन्याच्या पाच तारखेला हा UV लाँच करणार आहे.
Table of contents [Show]
प्रीमियम 3-रो सेगमेंटमध्ये प्रवेश
मारुती सुझुकी आपल्या नवीन UV INVICTO द्वारे प्रीमियम 3-रो सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी नेक्सा प्लॅटफॉर्मद्वारे INVICTO ची विक्री करणार आहे. मारुतीच्या नेक्सा डीलरशीपला भेट देऊन किंवा नेक्साच्या वेबसाइटवरून तुम्ही प्रीमियम कार INVICTO ची बुकींग करू शकता. कंपनी नेक्सा डीलरशीपच्या माध्यमातुन इग्निस, बलेनो आणि ग्रँड विटारा सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची वाहने विक्री करते.
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी INVICTO
मारुतीने नेक्सा ग्राहकांच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन कंपनी INVICTO लाँच करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. नवीन INVICTO अशा ग्राहकांसाठी योग्य असेल ज्यांना SUV आणि MPV असे दोन्ही वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करायची आहे. मारुतीची ही नवीन कार अशा लोकांना आवडेल ज्यांना मजबूत डिझाइन तसेच सर्वोत्तम श्रेणीतील प्रवासी कक्ष, भरपूर मालवाहू जागा, मजबूत कामगिरी, प्रगत तंत्रज्ञान आणि इतर अनेक वैशिष्ट्ये हवी आहेत.
बुकिंग कसे कराल
जर एखाद्या व्यक्तीला मारुतीची ही INVICTO कार खरेदी करायची असेल, तर तो कोणत्याही Nexa शोरूमला भेट देऊ शकतो आणि 25,000 रुपये भरून प्री-बुकिंग करू शकतो. त्याचबरोबर www.nexaexperience.com वर लॉग इन करूनही बुकिंग करता येईल. मारुती सुझुकी 5 जुलै 2023 रोजी नवीन INVICTO लाँच करेल.
Maruti Premium MPV
तसेच, मारुती सुझुकी इंडिया 5 जुलै रोजी आपले नवीन प्रीमियम वाहन MPV लाँच करीत आहे. मारुतीची ही एमपीव्ही पूर्णपणे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सारखी नसून, त्यामध्ये बाहेरील स्ट्रक्चरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. ही प्रीमियम एमपीव्ही मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाणार आहे.
मारुती एमपीव्हीमध्ये असे काही बदल पाहायला मिळतील, जे इनोव्हा हायक्रॉसपेक्षा अगदी वेगळे दिसेल, जसे की सुधारित ग्रिल मारुती एमपीव्हीमध्ये दिसेल. तसेच, हेडलाइट्स आणि टेललाइट्ससारखे मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जिथे कंपनी आपला ब्रँड बॅज लावते. सुझुकी ब्रँडचा बॅज तेथे दिसू शकतो. यामध्ये एकूण सात सिट असेल. एकूणच, हे वाहन काहीसे मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरसारखे असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.