देशांतर्गत शेअर बाजार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी लाल चिन्हावर बंद झाला होता. चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वात जास्त 3.5% पर्यंत घसरलेले बघायला मिळाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी काय घडते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या आठवड्यात सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजार कोणत्या दिशेने जातो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अदानी एन्टरप्राइज आणि DCX systems यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.
एनटीपीसीचे समभाग 3.25% वाढीसह बंद झाले आहेत. सोमवारी देखील बाजारात घसरण बघायला मिळाली होती. अमेरिका आणि युरोपच्या वायदे बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही विक्री दिसून आली. या काळात स्पाईसजेटचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले तर एनएमडीसी स्टीलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी उसळी मारली होती. जागतिक घडामोडींवरही गुंतवणूकदार लक्ष ठेऊन आहेत. देशांतर्गत शेअर बाजारांवर या सगळ्याचा परिणाम होत असतो. विश्लेषकांनी देखील याविषयीचे आपले अंदाज व्यक्त केले आहेत. LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक कुणाल शाह यांच्या मते, बँक निफ्टी निर्देशांक काही दिवसांच्या जोरदार विक्रीनंतर फ्लॅट बंद झाला. निर्देशांक आता 40500 च्या महत्त्वाच्या समर्थन क्षेत्राजवळ व्यापार करत आहे आणि जर तो या पातळीच्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाला तर तो 41,000-41,300 पातळीच्या दिशेने वळू धावू शकतो, असे ते म्हणाले.
DCX system या शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. सोमवारी 15 टक्क्यांची उसळी या शेसर्समध्ये बघायला मिळाली होती. मात्र मंगळवारी यात घसरण झाली. या पार्श्वभूमीवर बुधवारी काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मंगळवारी शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले होती आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून आली होती. देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात थोड्या तेजीने झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी सुरुवातीच्या वेळेत वरच्या श्रेणीत व्यवहार करताना दिसत होते. सेन्सेक्सची हालचाल हळूहळू वाढत सुरुवातीच्या काही मिनिटांतच त्याने 60,800 चा टप्पा ओलांडलेला बघ्याला मिळाला. निफ्टीही 17900 च्या पुढे गेला होता. मात्र मंगळवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत हे चित्र कायम राहू शकले नाही. सोमवारी लाल चिन्हासह बाजार बंद झाला होता. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घसरणीसह बाजार बंद झाला. अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स 1571.10 रुपयांवर बंद झाले होते. या शेअर्सच्या किमतीत 3.11 टक्के इतकी घट झाल्याचे बघायला मिळाले आहे . या पार्श्वभूमीवर या शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.