स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) 2023 ची वार्षिक बैठक सुरू झाली आहे. जगभरातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अशातच जगभरातले 6 नामांकित You Tuber दावोसला पोहोचले आहेत. World Economic Forum च्या संयोजकांनी या युट्युबर्सला रीतसर आमंत्रण दिले आहे.
भारतातील प्रसिद्ध यूट्यूब स्टार आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हिचाही या YouTubers मध्ये समावेश आहे, हे विशेष. ती Mostly Sane या नावाने देखील ओळखली जाते.
प्राजक्ता ही 29 वर्षीय कंटेंट क्रिएटर (Content Creator) असून यूट्यूबवर 6.8 दशलक्ष फॉलोअर्स (Followers) आहेत. इंस्टाग्रामवर (Instagram) तिच्या फॉलोअर्सची संख्या 73 लाख इतकी आहे.
प्राजक्ताने तिच्या कामाची सुरुवात शॉर्ट स्किट्स (Short Skits) पासून केली. मात्र, हळूहळू तिचे युट्यूब चॅनल प्रसिद्ध होत गेले त्यानंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग (Travel Blogging) आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती (Celebrity Interview) घेण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सध्या मुंबईत राहते. Fabceleby या वेबसाइटनुसार तिची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये इतकी आहे. दर महिन्याला ती सुमारे 40 लाख रुपये कमावते.
प्राजक्ताने Netflix मालिका Mismatched आणि अलीकडील जुग जुग जिओ (Jug Jug Jiyo)या बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले होते. तिने फोर्ब्स इंडिया 30 (Forbes India Under 30) मध्येही आपले स्थान निर्माण केले आहे.
2017 मध्ये, ओबामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राजक्ताला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. या वर्षी दावोसमध्ये महिला शिक्षण (Women Education) आणि हवामान बदलाबाबत (Climate Change) उचलली जाणारी मुद्दे हे युट्युब कव्हर करणार आहेत.