Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला कोट्याधीश बनवेल, महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करा

Post Office Scheme

Post Office Scheme: आजच्या परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. त्या योजनांमध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची हे तुम्हाला माहिती झाल्यास तुम्ही नक्कीच कोट्यधीश व्हाल, अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसमधील सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना. या योजनेमुळे दिर्घकाळात मोठी रक्कम उभारण्यास मदत करते.

Public Provident Fund Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये पैसे कसे गुंतवायचे हे तुम्हाला माहिती असेल तर अशा अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेबाबत तुम्ही ऐकलं असालचं. पोस्ट ऑफिसची ही योजना दीर्घकाळात मोठी रक्कम जमविण्यात खूप मदत करते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) योजनेमध्ये तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. म्युच्युअल फंड प्रमाणे यावर बाजारातील चढ-उताराचा परिणाम होत नाही. या योजनेवरील व्याजदर सरकार ठरवते. त्यांचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जाते.

खाते कुठे उघडायचे?

तुम्ही पीपीएफचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडू शकता. हे खाते केवळ 500 रुपयांमध्ये उघडता येते. यामध्ये वर्षाला 1.50 लाख रुपयांपर्यंत जमा करता येते. 15 वर्षानंतर हे खाते मॅच्युअर्ड होते. परंतु मॅच्युरिटीनंतरही 5 वर्षांच्या कालावधीत PPF खाते वाढवता येते.

महिन्याचे 12500 रुपये गुंतवा 

गुंतवणूकदाराने पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12500 रुपये जमा केल्यास आणि ते 15 वर्ष सलग भरल्यास, मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये गुंतवणूकदाराची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर 18.18 लाख रुपये त्याला मिळणारे व्याज असेल. ही गणना पुढील 15 वर्षांसाठी 7.1% व्याजदर गृहीत धरुन करण्यात आली आहे. व्याजदर बदलल्यास मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम बदलू शकते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज चक्रवाढ व्याज पध्दतीने मिळत असते.

अनेक पटीने होणार नफा

जर तुम्हाला पीपीएफ मध्ये मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजदरातून आणखी नफा पाहिजे असेल,तर  15 वर्षानंतर 5-5 वर्षांसाठी दोनदा मुदतवाढ द्यावी लागते. म्हणजे समजा आता तुमचा गुंतवणूकीचा कालावधी 25 वर्षांचा असेल, तर अशा प्रकारे 25 वर्षानंतर तुमचे एकूण पैसे 1.03 कोटी रुपये होतील. म्हणजेच या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये असेल, तर तुम्हाला व्याज उत्पन्न म्हणून 65.58 लाख रुपये मिळतील. आणि महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला पीपीएफ खाते 5-5 वर्षाने पूढे वाढवायचे असेल तर, तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल. एकदा का खाते मॅच्युअर्ड झाले तर खाते पुढे वाढवता येत नाही.

कर लाभही मिळतो

पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, ते आयकर कलम 80 सी अंतर्गत कर लाभ देण्यात येतो. यामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.