Poultry Business: ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने युवकांना विविध प्रकारच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ देण्याकरीता अनेक योजना आखल्या जातात. याचअंतर्गत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी)च्या वतीने 10 दिवसीय कुकुटपालन प्रशिक्षण देण्यात येते. तसेच हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आरसेटीच्या वतीने प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देखील दिल्या जाते. हे प्रमाणपत्र आणि प्रशिक्षणार्थीची व्यवसायाबाबतची पूढील योजना याआधारे कुठल्याही बँकेमधून लवकर कर्ज मिळत असते.
Table of contents [Show]
जागा आणि शेडचा खर्च
पोल्ट्री व्यवसाय सुरु करणे आजकाल फार सोपे झाले आहे. हा व्यवसाय सुरु करण्यास दोन ते तीन एकर जागेची आवश्यकता असते. जागा विकत घेण्याची क्षमता नसल्यास, तुम्ही जागा लीज (Lease) वर देखील घेऊ शकता. त्या जागेवर शेड टाकण्याची गरज असते. उत्तम दर्जाचे शेड टाकण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो. तसेच टेम्पररी तत्वावर 2 लाख रुपयांमध्ये देखील शेड उभारले जाऊ शकते.
कोंबड्यांचे प्रकार
जर तुम्ही कुकुटपालन व्यवसाय करण्याचा विचार करीत आहात, तर तुम्हाला कोंबड्यांचे कोणकोणते प्रकार असतात हे माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये कोंबड्यांचे तीन प्रकार असतात. लेयर, बॉयलर आणि देसी. देसी मध्ये क्रॉकेल हा देखील एक प्रकार आहे. अंडी मिळवण्यासाठी लेअर कोंबडीचा वापर केला जातो. लेअर कोंबडीचे पिल्लू पाच महिन्याचे झाले की अंडी देण्यास सुरुवात करते. बॉयलर कोंबडीचा वापर केवळ मांसाहार करण्यास केला जातो. ही कोंबडी इतर कोंबड्याच्या तुलनेत खूपच वेगाने वाढतात. देशी कोंबडीचा वापर हा अंडी आणि मांस या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी केला जातो.
नफ्याचे गणित
समजा तुम्ही अडीच ते तीन रुपये दराने एक असे देसी क्रॉकेल कोंबड्यांचे हजार पिल्लू विकत घेतले. हे हजार पिल्लू तीन हजार रुपयांना तुम्हाला मिळणार. या पिल्लांना लागणारे खाद्यान्न आणि व्हॅक्सीनेशनचा खर्च लक्षात घेतल्यास एका कोंबडीच्या पिल्लूला दोन महिन्यात 100 रुपये एवढा खर्च येतो. दोन महिन्यात ही पिल्ले मोठी होतात. त्यानंतर ती कंपन्यांना किंवा होलसेलरला
विकली जातात. एका पिल्लूच्या मागे 40 ते 80 रुपयांच्या दरम्यान नफा मिळत असतो. समजा 40 रुपये नफ्या प्रमाणे तुम्ही 1000 क्रॉकेल कोंबड्या विकल्या तर तुम्हाला त्यावर 40 हजार रुपये नफा मिळतो.
कुकुटपालन व्यवसायाचे फायदे
भारतात दुग्ध व्यवसाय आणि कुकुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर विविध योजना राबवत असतात. या व्यवसायाकरीता देण्यात येणाऱ्या कर्जावर बऱ्याचदा शून्य टक्के व्याजदर दिले जाते. तसेच हा व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन योग्य पध्दतीने व्यवसाय केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. मुक्त संचार पद्धतीने कुकुटपालन केल्यास सुधारित जातीच्या कोंबड्या नैसर्गिकपणे स्वत:चे खाद्य पदार्थ शोधू शकतात.