सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले, तरीही सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक पद्धतीमध्ये पोस्टातील योजनांचे नाव हमखास घेतले जाते. पोस्टातील अशीच एक योजना म्हणजे 'आवर्ती ठेव योजना'(Recurring Deposit Scheme). ही योजना बँकेतील मुदत ठेवी प्रमाणेच आहे. मात्र मुदत ठेवीत ग्राहक एकरकमी पैसे गुंतवू शकतात. तर आवर्ती ठेव योजनेत एसआयपी प्रमाणे मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. ज्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते.
सध्या सरकारने या योजनेतील व्याजदरात देखील वाढ केली आहे. पूर्वी या योजनेत 6.2 टक्के व्याजदर मिळत होता. मात्र आता 6.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. तेव्हा तुम्ही देखील पोस्टातील योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आवर्ती ठेव योजना चांगला पर्याय ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत मासिक 5000 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला किती परतावा मिळेल, जाणून घ्या
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त तितका त्या योजनेतून मिळणार फायदा जास्त. या योजनेत किमान 100 रुपयांची गुंतवणूक करून खाते उघडता येते. त्यानंतर तुम्ही दरमहा कितीही रक्कम यामध्ये गुंतवू शकता. यामध्ये 3 लोक एकत्र येऊन जॉईंट अकाउंट ओपन करू शकतात. तसेच 10 वर्षा पुढील मुलाच्या नावाने पालक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षाचा असून त्यानंतर 5 वर्षासाठी तो कालावधी वाढविला जाऊ शकतो. तशी माहिती पोस्ट ऑफिसला देता येऊ शकते. तसेच 3 वर्षांनंतर उघडलेले खाते मॅच्युरिटी पूर्वी बंद देखील केले जाऊ शकते. परंतु हे खाते बंद केल्यावर ग्राहकांना बचत खात्यातील व्याजदर लागू करण्यात येईल.
महिना 5000 रुपये गुंतवल्यावर किती परतावा मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर 5000 रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली, तर 6.5 टक्के व्याजानुसार मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला 8 लाख 44 हजार 940 रुपये मिळतील. या योजनेत एकूण गुंतवणूक 6 लाख रुपयांची होणार आहे. तर 2 लाख 44 हजार 940 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे.
Source: hindi.financialexpress.com