• 27 Mar, 2023 05:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कूलरच्या किमतीत मिळतायेत Portable AC, जाणून घ्या अधिक माहिती

Portable Ac

Image Source : www.evapolar.com

Portable AC: तुम्हीही उन्हाळ्यात एसी(AC) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला Portable AC बद्दल माहिती सांगणार आहोत. या एसीसाठी फारशी जागा लागत नसल्याने अनेकांची याला पसंती मिळत आहे. कोणते आहेत असे एसी, चला जाणून घेऊयात.

नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. सगळीकडेच उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच या उन्हाळ्यात एसीची मागणी सर्वाधिक आहे. तुम्हीही नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा एसीबद्दल माहिती देणार आहोत जो कोणत्याही जागेत सहज फिट होऊ शकतो. तसेच, त्याला फारशी जागा लागत नाही. हा एसी एका ठिकाणावरून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाऊ (Portable) शकता. त्यामुळेच तो वापरणे देखील अधिक सोपे आहे. कोणते आहेत असे एसी (AC) जाणून घेऊयात.

Bluestar 1 Ton Portable AC

bluestar-1-ton-portable-ac.jpg
www.amazon.in.com

तुम्ही विजय सेल्समधून ब्लूस्टार 1 टन पोर्टेबल एसी (Bluestar 1 Ton Portable AC) खरेदी करू शकता. सध्या या AC वर बंपर डिस्काउंट (Discount) उपलब्ध असल्यामुळे हे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर डील ठरू शकते. या एसीची किंमत 39,000 रुपये आहे, परंतु 15% डिस्काउंटनंतर तुम्हाला तो 32,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर वेगळी 5% सवलत देखील देण्यात येत आहे, परंतु ही डील फक्त निवडक क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे.

Lloyd 1 Ton 3 Star Portable AC

lloyd-1-ton-3-star-portable-ac.jpg
wwwchrome-extension.com

लॉयड 1 टन 3 स्टार पोर्टेबल एसी (Lloyd 1 Ton 3 Star Portable AC) तुम्ही  फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या एसीची किंमत 40 हजार रुपये आहे. 13% सवलतीनंतर 34,599 रुपयांना तुम्ही हा एसी खरेदी करू शकता. हा एसी खरेदी करण्यासाठी अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. डीबीएस बँकेच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. अशीच ऑफर IDBI कार्डवर देखील उपलब्ध आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की, इतक्या महागड्या किमतीत कूलर कसा काय येतो? सध्या मार्केटमध्ये अनेक स्वस्त कुलर आहेत. मात्र सिम्फनी कंपनीचा Symphony Movicool Xl 100 G कूलर अतिशय महागडा आहे. हा कुलर 34,800 रुपयांपासून सुरु होतो. थोडक्यात काय तर, हा कूलर या पोर्टेबल एसीपेक्षा महाग आहे. म्हणजेच हे डील तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुम्हीही यंदा घरी एसी घेण्याचा विचार करत असाल, तर वरील दोन पर्यायांपैकी एका एसीची निवड नक्कीच करू शकता.