जर्मनीची लक्झुरी कार उत्पादक पोर्शे कंपनीने महागडी कार Porsche 911 S/T ही कार भारतीय बाजारपेठेत लॉंच केली आहे. या कारची किंमत 4 कोटी 26 लाख (Ex Showroom, India) इतकी आहे. या लक्झुरी कारचे वैशिष्टे म्हणजे कंपनीकडून केवळ 1963 कार्सची विक्री केली जाणार आहे.
पोर्शेने 60 वर्धापन दिनानिमित्त Porsche 911 S/T या कारची केवळ 1963 मॉडेल तयार केली आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला कंपनीने Porsche 911 S/T कारचे ग्लोबल लॉंचिंग केले होते.
पोर्शेच्या 911 मॉडेल्समध्ये Porsche 911 S/T हे नवीन मॉडेल आहे. भारतात यापूर्वी कंपनीने टुर्बो एस, कॅरेरा, कॅरेरा टी आणि GT3 RS हे मॉडेल्स लोकप्रिय आहेत.
Porsche 911 S/T या कारचे डिझाईन GT3 RS प्रमाणे आहे. स्पोर्ट्स लूक असलेल्या या खास मॉडेल्सने 1969 मधील 911 S या रेसिंग कारच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Porsche 911 S/T ची डिझाईन ही सार्वजनिक रस्त्यांवर वापरता येईल, अशा पद्धतीने कंपनीने तयार केली आहे. यात हलक्या वजनाच्या काचेचा आणि कार्बन फायबर रेनफोर्स प्लॅस्टिक हे मटेरिअल वापरण्यात आले आहे.
Porsche 911 S/T मधील इंजिन आणि इतर वैशिष्टये ही GT3 RS प्रमाणे सारखीच आहेत. यात शक्तिशाली 4.0 लिटरचे 6 पेट्रोल इंजिन आहे. मात्र Porsche 911 S/Tमध्ये 6 स्पीडचा मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. GT3 RS या कारमध्ये 7 स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. Porsche 911 S/T या कारचा स्पीड 0-100 किमी अवघ्या 3.7 सेकंदात पूर्ण करते. हीचा ताशी वेग 300 किमी इतका असल्याचे कंपनीने म्हटले आहे.