Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB launches IVR based UPI 123PAY: पीएनबीच्या ग्राहकांना इंटरनेट शिवाय आर्थिक व्यवहार करता येणार; कसे, जाणून घ्या

PNB launches IVR based UPI 123PAY

Image Source : www.pnbindia.in

PNB launches IVR based UPI 123PAY: पंजाब नॅशनल बँकेने आयवीआर (IVR) आधारित यूपीआय (UPI) सेवा सुरू केली आहे. ज्याचं नाव आहे, 'UPI 123PAY'. या सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट शिवाय आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. या नवीन सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पंजाब नॅशनल बँक (PNB) ही देशातील खासगी क्षेत्रातील नामांकित बँक आहे. या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा आणली आहे. बँकेने आयवीआर आधारित यूपीआय सेवा सुरू केली आहे. ज्याचं नाव आहे, 'UPI 123PAY'.  या सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट शिवाय आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. सध्या सर्वच बँका डिजिटल व्यवहारांकडे वळल्या आहेत. मात्र यूपीआय 123 पे ( UPI 123PAY) सेवा देणारी पंजाब नॅशनल बँक खासगी क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. या सेवेमुळे बँकेचे व्यवहार हे कॅशलेस आणि कार्डलेस पद्धतीने होण्यासाठी मदत होणार आहे. बँकेच्या या नवीन सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

‘UPI 123PAY’ सेवा नक्की काय आहे?

भारतातील एक मोठा वर्ग ग्रामीण आणि निमशहरी भागात राहतो. हा वर्ग अजूनही त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी कॅशवर (Cash) अवलंबून असतो. बँकेचे बहुतांश ग्राहक हे देखील ग्रामीण आणि निमशहरी भागात राहतात. या भागात इंटरनेट सेवा फारशी चांगली नसल्याने लोकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत UPI 123pay ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी मदत करेल.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे 24- तास आर्थिक व्यवहार (पेमेंट) करण्यासाठी मदत करतात.  ग्राहकांना जलद, एनक्रिप्टेड आणि रिअल- टाईम मध्ये पेमेंट करण्यासाठी ही सेवा उपयोगी पडते. आतापर्यंत ही सेवा केवळ स्मार्टफोन किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (USSD) सेवेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत होती. ज्यासाठी चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यक होती. मात्र आता पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक इंटरनेटशिवायही पेमेंट करू शकतील.

‘UPI 123PAY’ वरून आर्थिक व्यवहार करताना UPI PIN ची आवश्यकता आहे का?

UPI 123 Pay वर तुम्हाला तुमचे खाते ओपन करून त्याची नोंदणी करावी लागेल. सोबतच तुम्हाला UPI पिन सेट करावा लागेल. ग्राहकांनी व्यवहार करताना प्रत्येक वेळी UPI पिन टाकावा. जर ग्राहकांकडे आधीच UPI पिन असेल, तर ते तोच UPI पिन आर्थिक व्यवहारासाठी वापरू शकतात.

‘UPI 123PAY’ कोणत्या भाषा सध्या सपोर्ट करत आहेत?

सध्या UPI 123 Pay वर इंग्रजी, हिंदी आणि कन्नड या तीन भाषा फिचर फोन पेमेंटसाठी सपोर्ट करत आहेत. ज्याचा वापर करून ग्राहक आर्थिक व्यवहार करू शकतात. भविष्यात या भाषा वाढवल्या जाऊ शकतात.

‘UPI 123PAY’ चा वापर कसा करावा?

1) पंजाब नॅशनल बँकेचा आयवीआर नंबर 9188-123-123 तुम्हाला डायल करावा लागेल. 
2) तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करणार आहात त्याचे नाव तुम्हाला निवडावे लागेल. 
3) Transaction ला सर्टिफाईड करा  आणि पेमेंट करा.

आयवीआर पेमेंट सेवा इतर कोणत्या बँका देत आहेत?

पंजाब नॅशनल बँके व्यतिरिक्त (PNB),  आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC), सिटी युनियन बँक (City Union Bank) आणि एनएसडीएल पेमेंट बँक (NSDL Payment Bank) IVR पेमेंट सेवा देत आहेत.

Source: economictimes.indiatimes.com