Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स गुंतवणूकदारांना देणार खूशखबर, 3 वर्षात 22 ते 70च्या जवळ पोहोचला शेअर

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स गुंतवणूकदारांना देणार खूशखबर, 3 वर्षात 22 ते 70च्या जवळ पोहोचला शेअर

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स आपल्या गुंतवणूकदारांना एक खूशखबर देणार आहे. पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी असलेल्या पीएनबी गिल्ट्सनं मागच्या काही तिमाहीत तसंच आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. आता याच जोरावर आपल्या गुंतवणूकदारांना कंपनीनं चांगली बातमी देण्याचं ठरवलं आहे.

पीएनबी गिल्ट्सच्या (Punjab Nationa Bank Gilts) शेअरची किंमत साधारणपणे वर्ष 2020मध्ये 22 रुपये इतकी होती. याच शेअरची (Share) आता म्हणजेच 19 जुलै 2023 रोजीची किंमत जवळपास 70 रुपयांच्या जवळ वाढली आहे. कंपनी शुक्रवारी म्हणजेच 21 जुलै रोजी लाभांश (Dividend) जाहीर करणार आहे. 21 जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 31 जुलै ही कंपनीनं निश्चित केलेली एक्स-डिव्हिडंड तारीख आहे.

असा दिला होता लाभांश

25 ऑगस्ट 2022 रोजी, कंपनीनं 5 रुपये, सप्टेंबर 2021 रोजी 3 रुपये, फेब्रुवारी 2021 रोजी 3 रुपये, 18 नोव्हेंबर 2020 रोजी 3 रुपये, 3 सप्टेंबर 2020 रोजी 3 रुपये प्रति शेअर लाभांश कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दिला होता.

प्रवर्तकांचा हिस्सा किती?

कंपनीतला प्रवर्तकांचा हिस्सा 74.07 टक्के इतका आहे. मागच्या 5 तिमाहीत यात कोणताही बदल झालेला नाही. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 0.33 टक्के आहे.

तोट्यातून नफ्याकडे कंपनीचा प्रवास

2022च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. 6.1 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत 6.09 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. उत्पन्न 263 कोटींवरून 297 कोटी रुपये झाले आहे. तिमाही निकालानंतर कंपनीचा शेअर 4.21 टक्क्यांनी वाढून 66.90वर बंद झाला आहे. पीएनबी गिल्ट्स कर्ज बाजार आणि बाँडशी संबंधित सेवा देते.

पीएनबी गिल्ट्स नेमकं काय करते? 

ही पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी आहे. ट्रेझरी बिलं, सरकारी बाँड्स, राज्य सरकारचे बाँड्स, पीएसयू बाँड्स, कॉर्पोरेट ठेवी, सीएसजीएल (CSGL) खाती, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स यांच्याशी संबंधित सेवा कंपनीतर्फे दिल्या जातात. त्याचबरोबर मर्चंट बँकिंग, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूशन आणि इक्विटी तसंच इक्विटी डेरिव्हेटिव्हजमधली गुंतवणूक आणि यासंबंधीच्या व्यापारामध्ये कंपनी गुंतलेली आहे.