रिलायन्सच्या (Reliance industries limited) या बैठकीत जून तिमाहीच्या आर्थिक निकालांनाही बोर्ड मान्यता देणार आहे. कंपनीनं याबाबत स्टॉक एक्स्चेंजला (Stock exchange) माहिती दिली आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीनं देशातली सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची बोर्ड बैठक 21 जुलैला होणार आहे. कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला सांगितलं, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो, की 21 जुलै रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या इक्विटी शेअर्सवर (Equity shares) लाभांशाची (Dividend) शिफारस करण्याचा प्रस्ताव आहे.
Table of contents [Show]
एका वर्षात पहिला लाभांश
कंपनीच्या बोर्डानं लाभांशाची शिफारस केल्यास, तो 2022-23 या आर्थिक वर्षासाठी असणार आहे. गेल्या एका वर्षात पहिल्यांदाच कंपनी लाभांश जाहीर करणार आहे. यापूर्वी 8 मे रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) प्रति शेअर 8 रुपये लाभांश जाहीर केला होता.
तिमाही निकाल येणार
रिलायन्स इंडस्ट्रीज 21 जुलै रोजी कंपनीचे तिमाही निकालदेखील (RIL Q1 परिणाम घोषणा तारीख) जाहीर करणार आहे. जून तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात दुहेरी अंकी घसरण होऊ शकते, असा विश्वास बीओएफए (BofA) सिक्युरिटीजला आहे. कंपनीच्या O2C विभागातल्या खराब कामगिरीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निव्वळ नफ्यात घट होण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेजचा अंदाज
ब्रोकरेजच्या अंदाजानुसार, कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 10 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 16 टक्क्यांनी घट होऊ शकते. त्याचबरोबर एकत्रित महसुलात वार्षिक आधारावर सात टक्के आणि तिमाही आधारावर चार टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आणखी एक कंपनी होणार लिस्ट
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड 20 जुलैपासून निफ्टी 50 तसंच इतर इंडेक्सवर येणार आहे. स्टॉक एक्स्चेंजनं म्हटलं, की 20 जुलैला एक स्पेशल प्री-ओपन सेशन आयोजिक करण्यात येणार आहे. निफ्टी 50 शिवाय जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500सह 18 इतर इंडेक्सवर येणार आहे.