Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMSBY : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, 12 रूपयांत 2 लाखांचा विमा

PMSBY : पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, 12 रूपयांत 2 लाखांचा विमा

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सरकारने वर्षाला 12 रूपयांचा प्रीमियम भरून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली.

केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) अंतर्गत अपघात विमा पॉलिसी (Personal Accident Insurance Scheme) आणली आहे. या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपघातादरम्यान दिव्यांगत्व आल्यास 2 लाखांपर्यंतचे संरक्षण मिळते. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात देशातील प्रत्येक नागरिकाचा विमा असणं आवश्यक आहे. पण उपलब्ध असलेल्या विमा योजनांचा प्रीमियम अधिक असल्याने सर्वसामान्यांना तो परवडत नव्हता. यासाठी देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे विमा धारकाला प्रत्येक महिन्याला 1 रूपये असे वर्षाला 12 रूपये प्रीमियम भरून 2 लाख रूपयांचा लाभ मिळणार आहे.

पंतप्रधान विमा योजनेची वैशिष्ट्ये

1. अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक याचे लाभार्थी आहेत.
2. 18 ते 70 वयोगटातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3. लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
4. या योजनेसाठी प्रत्येक वर्षाला लाभार्थ्याच्या खात्यातून 12 रूपये कापून घेतले जातील.
5. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला 2 लाख रूपयाचे अर्थसाहाय्य दिले जाते. 
6. विमाधारकाला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये आणि आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रूपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.
7. या योजनेचा लाभ एलआयसी (LIC) किंवा कोणत्याही विमा कंपनीतून घेता येऊ शकतो.

योजनेत या गोष्टींचा समावेश नाही

या योजने अंतर्गत विमाधारकाचा आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाल्यास किंवा त्यामुळे अपंगत्व आल्याचे सिद्ध झाल्यास विमाधारकाला योजनेतून कोणताही लाभ दिला जाणार नाही.

योजनेचा असा लाभ घ्या

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ तुमच्या सुरू असलेल्या बचत खात्यातून घेता येतो. यासाठी जनसुरक्षा या संकेतस्थळावरून फॉर्म डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म भरून बॅंकेत जमा करा. बॅंकेतर्फे सदर फॉर्मवर प्रक्रिया झाल्यानंतर तुमची विमा पॉलिसी सुरू होईल.

विम्याचा दावा कसा करायचा?

या योजने अंतर्गत विमाधारकाच्या कुटुंबियांना दावा दाखल करायचा असेल तर वरील जनसुरक्षा संकेतस्थळावरून दाव्याचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्रे जोडून बॅंकेकडे जमा करावा लागेल. बॅंककडून या दाव्याची तपासणी करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विम्याची रक्कम नॉमिनीच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची अधिक माहिती https://www.jansuraksha.gov.in/ या संकेतस्थळावरून मिळू शकते. तसेच महाराष्ट्र बॅकेच्या 1800 102 2636 या टोल फ्री क्रमांकावरून माहिती विचारता येऊ शकते.