Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Platform Ticket Hike ; 15 दिवसांकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये

Platform Ticket Hike ; 15 दिवसांकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये

Mumbai Railway Platform Ticket: मध्य रेल्वेने मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरात वाढ केली आहे. ही दरवाढ 9 मे, 2022 ते 23, मे 2022 पर्यंत असणार आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. गर्दीमुळे आपत्कालीन साखळी ओढण्याचे प्रकार वाढत असल्याने, यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने 9 मे पासून 23 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीटचे दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे नातेवाईक हे गाडीत सीटपर्यंत जाऊन गप्पा मारत असतात. अशावेळी ट्रेन सुटल्यावर संबंधित प्रवाशाचे नातेवाईक पत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवतात. यामुळे ट्रेन निश्चित वेळेपेक्षा उशिरा सुटते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. मध्य रेल्वेने केलेल्या या दरवाढीमुळे काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारपासून 23 मे पर्यंत म्हणजे 15 दिवसांकरता ही दरवाढ असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनेवल याच स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहे.

एसी लोकल आणि फस्ट क्लासचे तिकीट स्वस्त 

दरम्यान, मुंबईतील एसी लोकलच्या तिकीटांचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. 5 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी एसी लोकलचे तिकिट 30 रुपये असणार आहे. याआधी हा तिकीट दर 65 रुपये होता. तर सध्या फर्स्ट क्लासचे ठाणे ते सीएसएमटीचे (CSMT) फर्स्ट क्लासचे 140 रुपयांचे तिकीट आता 85 रुपयांपर्यत मिळणार असून, ते 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पण एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही ते दर आधीप्रमाणेच आहेत. ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित रेल्वे प्रवास स्वस्त झाल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

Image source -https://bit.ly/37rlXEW