Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Solo Trip Budgeting: सोलो ट्रिपवर जायचा विचार करताय? पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Solo Trip

तुम्ही देखील जर अशाच एखादी सोलो ट्रिपचे नियोजन करत असाल तर सहलीचा सहज आणि आनंददायी अनुभव घेण्यासाठी योग्य ती आर्थिक तयारी आवश्यक असते, हे लक्षात ठेवा.तुम्ही देखील जर सोलो ट्रीपवर जायचा विचार करत असाल हा लेख वाचाच.

सोलो ट्रीप करण्याची अनेकांची इच्छा असते. गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मोठ्या प्रमाणात सोलो ट्रीप करताना दिसते आहे. मग ती राज्यभरात, देशात किंवा परदेशात कुठेही असो. एकट्याने जग बघणे, अनुभवणे, नवे मित्र-मैत्रिणी जोडणे आणि कमी खर्चात जगाची विविधता अनुभवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ही ट्रीप केली जाते. युट्युबवर असे अनेक युट्युबर आहेत जे सातत्याने अशा सोलो ट्रीपवर जात असतात आणि व्हिडियोच्या माध्यमातून चाहत्यांना, दर्शकांना देखील नवनवी ठिकाणे दाखवत असतात.

तुम्ही देखील जर अशाच एखादी सोलो ट्रिपचे नियोजन करत असाल तर सहलीचा सहज आणि आनंददायी अनुभव घेण्यासाठी योग्य ती आर्थिक तयारी आवश्यक असते, हे लक्षात ठेवा.तुम्ही देखील जर सोलो ट्रीपवर जायचा विचार करत असाल हा लेख वाचाच.

बजेट तयार करा

तुम्ही ज्या ठिकाणी सहलीसाठी जाणार आहात त्या ठिकाणाची आधी सविस्तर माहिती आधीच करून घ्याआणि त्यानुसार तुमचे आर्थिक नियोजन देखील करा. सहलीच्या ठिकाणाचे अंतर, तिथला प्रवास, प्रवासाचे माध्यम, राहण्याची सोय, खाण्या-पिण्याचे ऑप्शन. या सगळ्यांचा विचार करून तुम्हांला एक बजेट बनवावे लागेल. त्यामुळे तुम्हांला खर्चाचा अंदाज तर येईलच परंतु नियोजनपूर्वक खर्चातून बचत देखील होईल.

010623-3.jpg

प्रवासाचे आणि मुक्कामाचे नियोजन 

तुम्ही जर भारतातच, देशांतर्गत प्रवास करणार असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट हाच उत्तम पर्याय म्हणून स्विकारायला हवा. कारण तुम्ही जर सोलो ट्रिपसाठी जात असाल, देशाची विविधता बघण्यासाठी जात असाल तर ती विविधता तुम्हांला सार्वजनिक बस, ट्रेन आदी साधनांचा विचार करा. एक तर हा पर्याय किफायतशीर आहे आणि सोलो ट्रीपच्या दृष्टीने तुम्हांला उत्तम अनुभव देणारा देखील ठरेल.

जर तुम्ही भारताबाहेर सोलो ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला फार आधीच प्रवासाचे नियोजन करावे लागेल. विविध एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल वेबसाइटवरील विमानाच्या तिकिटांचे दर बघून घ्या. एअरलाइन्सच्या वेगवगेळ्या ऑफर जेव्हा सुरु असतात तेव्हा तिकीट बुक करणे कधीही फायदेशीर ठरेल.

भारत वेगवेगळ्या बजेटसाठी वेगवगेळ्या निवास पर्यायांची सोय उपलब्ध आहे. पैसे वाचवण्यासाठी आणि ट्रीपची फुल मजा घेण्यासाठी बजेट हॉटेल, वसतिगृहे किंवा अतिथीगृहांमध्ये राहण्याचा विचार करा. यासोबतच तुम्ही होमस्टे हा ऑप्शन देखील एक्सप्लोर करू शकता.

सार्वजनिक वाहतूक आणि जेवणाची सोय 

भारतात फिरताना सर्वात परवडणारा मार्ग म्हणजे सार्वजनिक वाहतूक. शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी बस, ट्रेन आणि मेट्रोचा वापर करा. सवलतीच्या दरात प्रवास करायचा असेल तर स्थानिक प्रवास कार्ड किंवा पास खरेदी करण्याचा विचार करा, त्यामुळे तुमचे पैसे वाचतील. Ola आणि Uber सारख्या राइड सेवा अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, परंतु हा ऑप्शन थोडा खर्चिक ठरू शकेल.

भारतातील खाद्य संस्कृती जगात प्रसिध्द आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर  स्वादिष्ट आणि स्वस्त अशा  स्ट्रीट फूडचा अनुभव घ्या. कमी किमतीत अस्सल फ्लेवर्स अनुभवण्यासाठी परिसरातील भोजनालयात स्थानिक पाककृतींचा आनंद घ्या. सोबतच आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हॉटेलची स्वच्छता विचारात घ्या.

solo-trip-internal-image-2.jpg

ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि आपत्कालीन निधी

सोलो ट्रीपला जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात मेडिकल एमर्जन्सी, ट्रिप रद्द झाली तर त्यातील नुकसान भरपाई आणि हरवलेल्या वस्तूंची भरपाई देखील समाविष्ट आहे. तुमच्या गरजा आणि बजेटमध्ये बसणाऱ्या सर्वसमावेशक अशा प्रवास विमा योजनांचा विचार करा.

प्रवासात जर काही अनपेक्षित घटना घडल्या, तर त्यासाठी देखील तुमचे नियोजन असायला हवे. कधी सामान, मोबाईल चोरीला गेला, काही अपघात झाला किंवा अशाच काही अनपेक्षित घटना घडल्या तर त्यासाठी आपल्याकडे पुरेसा निधी असायला हवा म्हणून काही अतिरिक्त पैसे बाजूला ठेवा.

खर्चाचा मागोवा घ्या

ट्रीपच्या आधी तुम्ही जे बजेट बनवले आहे त्याचे निरीक्षण करण्यासाठी ट्रिप दरम्यान तुमच्या खर्चाची नोंद ठेवा. खर्चाच्या नोंदी ठेवण्यासाठी एक्सेल शीटचा वापर केल्यास उत्तम. त्यातून दैनंदिन किती खर्च झाला याची गोळा बेरीज करणे सोपे जाईल. सोबतच कुठल्या गोष्टींवर तुमचा अधिक खर्च होतोय हे देखील सहज ओळखता येईल आणि खर्चावर नियंत्रण मिळवता येईल.

या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या सोलो ट्रीपचे आर्थिक नियोजनाचे काटेकोरपणे नियोजन करून आणि बजेट लक्षात घेऊन तुम्ही तुमची सोलो ट्रीप अविस्मरणीय बनवू शकता.