क्रेडिट कार्डमुळे आर्थिक गोष्टी बऱ्याच सहज झाल्या आहेत. तसेच, त्यावरील ऑफर्समुळे बरेच जण त्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे बहुतेकांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आहेत. अशावेळी काही कार्ड विना वापराचे तसेच पडून राहतात. तर मग बरेच जण तो बंद करण्याचा निर्णय घेतात. तर कोणत्या परिस्थितीत ते बंद करायला पाहिजे. तसेच, ते बंद केल्यावर काय परिणाम होऊ शकतो. याविषयी आपण जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड बंद कधी करावे?
तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कार्ड आहेत. मात्र, काही कार्डाचा वापर होत नाही. तेव्हा तुम्ही कार्ड बंद करायचा निर्णय घेऊ शकता. याशिवाय, तुमच्या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क आणि अन्य शुल्क जास्त असतील तेव्हा देखील तुम्ही कार्ड बंद करु शकता. कारण, गरज नसताना तुम्हाला त्यावर शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या कार्डसाठी पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही.
तसेच, तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत असल्यास, अशावेळी देखील तुम्ही बंद करण्याचा निर्णय घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर वापरात नसलेले क्रेडिट कार्ड बंद करणे चांगला पर्याय ठरु शकते. कारण, ते बंद केल्यास लोनवर तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो.
युटिलायझेशन रेट सुधारेल
क्रेडिट कार्ड बंद करणे, तुमच्यासाठी चांगेल आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन येते. तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करताना त्यात बॅलन्स असल्यास, तुमचा युटिलायझेशन रेट सुधारायला मदत होते. क्रेडिट युटिलायझेशन रेट म्हणजे एकूण क्रेडिट लिमिटच्या तुलनेत वापरल्या जाणाऱ्या क्रेडिटची रक्कम होय.
क्रेडिट युटिलायझेशन रेट जितका कमी असेल तितका क्रेडिट स्कोअर चांगला राहयला मदत होते. शिवाय एखादे क्रेडिट कार्ड वापरताना, त्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली नसल्यास ते बंद केल्याने क्रेडिट स्कोअरचे पुढील नुकसान टाळायला मदत होते.
क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
क्रेडिट कार्ड बंद केल्यास यामुळे उपलब्ध क्रेडिट कमी होते, त्यामुळे क्रेडिट युटिलायझेशनचा दर वाढतो आणि क्रेडिट स्कोअर कमी होतो. शिवाय, यामुळे कार्ड धारकाच्या क्रेडिट हिस्ट्रीचा काळ कमी होईल आणि त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. तसेच, ज्यांची क्रेडिट हिस्ट्री दीर्घ आहे त्यांच्या खात्याचा सरासरी वापर कमी दाखवेल, ज्याचा पुन्हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करु शकता.