सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी. कारण सरकारकडून आता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किमती 10 टक्क्यांनी कमी होणार असल्याने पेट्रोल-डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताच बदल न झाल्याने किमती कमी झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
Table of contents [Show]
पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यामागील कारण (Reason behind petrol-diesel becoming cheaper)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 81 डॉलर झाल्याने येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलचा दर प्रति लिटर 14 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाचा सरासरी भाव प्रति बॅरल 74 डॉलर झाला आहे. तर भारतीय रिफायनरीसाठी कच्च्या तेलाच्या किमती सरासरी प्रति बॅरल 82 डॉलर झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत. पण या काळात देशांतर्गत कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील अशी शक्यता आहे.
कच्च्या तेलाचे दर घसरले (Crude oil prices fell)
ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरच्या जवळ असून WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 78 डॉलर झाले आहे. जानेवारी महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींनी $150 ची पातळी गाठली होती. आज ती 85 डॉलर ते 75 डॉलरच्या दरम्यान ट्रेड करत आहे. मार्चमध्ये या तेलाची किंमत प्रति बॅरल 112.8 डॉलर झाली होती. यावरुन लक्षात येते की, मागील 8 महिन्यात रिफायनरी कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमती 27 टक्क्यांनी म्हणजेच 31 डॉलरने कमी झाल्या आहेत.
एकाचवेळी कपात शक्य नाही (Simultaneous reduction is not possible)
कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल एक डॉलरची घट होते तेव्हा भारतीय कंपन्यांना लिटरमागे 45 पैसे कमी मोजावे लागतात. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रति लिटर 14 रुपयांनी कमी झाल्या तरी ही कपात एकाच वेळी होण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
अशी ठरते कच्च्या तेलाची किंमत (How is the price of crude oil determined)
कच्च्या तेलाच्या किमती या केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जमा केलेले कर, रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचा दर, देशातील इंधनाची मागणी यावर ठरते. 2014 पासून तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज ठरवतात.