Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension plan in India 2022 : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी 'या' योजना देतात चांगला पर्याय

Pension Plans 2022

Best pension plan in India 2022 : आपल्या उतारवयासाठी आर्थिक नियोजन करणे महत्वाचे ठरते. नोकरी अथवा व्यवसाय करताना यात गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दरमहा किवा एकत्रितपणे एक निश्चित रक्कम मिळते. ज्याचा वृद्धापकाळात उपयोग होतो. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतात. यातल्या काही स्कीम्सविषयी जाणून घेऊया.

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 रिटायर  (HDFC Life Click 2 Retire)

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 रिटायर या स्कीमचा प्रवेश 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान, मुदतपूर्ती 45 ते 75 वर्षे आणि पॉलिसी कालावधी 10 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे. एचडीएफसी लाइफ - क्लिक 2 रिटायर प्लॅन ही युनिट-लिंक्ड पेन्शन योजना आहे. या स्कीममध्ये प्रवेश करण्यासाठी, exit करण्यासाठी आणि पॉलिसी अडमिनिस्ट्रेशनसाठी  कोणताही चार्ज नाही. सिंगल पे आणि लिमिटेड पे असे पर्याय उपलब्ध आहेत. दर महिन्याला 2 हजार रुपयापासून यात प्रवेश करता येतो.

मॅक्स लाईफ गॅरंटेड लाईफटाइम इन्कम प्लॅन (Max Life Guaranteed Lifetime Income Plan) 

मॅक्स लाईफ गॅरंटेड लाईफटाइम इन्कम प्लॅन Immediate Annuity, Deferred Annuity अशा दोन प्रकारे उपलबद्ध आहे. अनुक्रमे 0 ते 80 वर्षे, 30 ते 80 वर्षे असा यामध्ये प्रवेशाचा कालावधी आहे. मुदतपूर्ती कालावधी 31 ते 90 वर्षे असा आहे. यामध्ये मिनिमम प्रीमियम अमाऊंट 1 हजार इतकी आहे.

एसबीआय लाईफ सरल रिटायरमेंट सेवर  (SBI Life Saral Retirement Saver) 

एसबीआय लाईफ सरल रिटायरमेंट सेवर मधील प्रवेशसाठी 18 ते 65 वर्षे, मुदतपूर्तीसाठी 40 ते 70 वर्षे, पॉलिसी कालावधी 5 ते 40 वर्षे इतका आहे. यासाठी मासिक, सहामाई, वार्षिक असे प्रीमियम मोड देखील उपलब्ध आहेत. आयकर नियमाप्रमाणे इथे इन्कमटॅक्स बेनिफीट घेणे शक्य आहे.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) 

सरकारी पेन्शन योजना म्हणून अटल पेन्शन योजनेला ओळखले जाते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. अटल पेन्शन योजनेत दरमहा 1 हजार ते 5 हजार यापैकी एक पेन्शन प्लॅन निवडावा लागतो. यानुसासर 60 व्या वर्षापर्यंत दरमहा रक्कम भरावी लागते. 60 वर्षानंतर दरमहा मासिक पेन्शन मिळते. 1 ते 5 हजार रुपयापर्यंत ज्या पर्यायाची निवड केली जाते, त्यानुसार दरमहा भरायची रक्कम निश्चित होते. 

याव्यतिरिक्त नॅशनल पेमेंट सिस्टिमसारखी पेन्शन योजना आहेत. यातील तुमच्यासाठी कुठली योग्य आहे हे तुमच्या गरजा काय आहेत त्यावरदेखील अवलंबून आहे. स्कीमचे तपशील बारकाईने लक्षात घेऊन पेन्शन प्लॅन निवडणे योग्य ठरते.