पेटीएमच्या सहाय्याने ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषत: लहान मोठ्या व्यवसायिकांसाठी पेटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणे सोपे झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेटीएमचा पेमेंट साऊंड बॉक्स (PaytM Sound Box) होय. पेटीएमने आता क्रिडिट आणि डेबिट कार्डने होणाऱ्या पेमेंटसाठी देखील सूचना देणारा साऊंड बॉक्स उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.
क्यू आर कोड स्कॅनिंगसह कार्ड पेमेंटचा अलर्ट
यापूर्वी जे व्यावसायिक पेटीएमच्या माध्यमातून ग्राहकांकडून पेंमेट स्वीकारत होते. त्यांना पेटीएमच्या साऊंड बॉक्समुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट जमा झाल्याची खात्री क्षणात होत होती. त्यामुळे एखाद्या ग्राहकांकडून होणारी फसवणूक अथवा तांत्रिक बाबींमुळे पेमेंट न झाल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले आहे. यामध्ये पेटीएमकडून आणखी सुविधा प्राप्त करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी व्यावसायिकांना केवळ मोबाईल अॅप्लिकेशनच्या क्यू आर कोड स्कॅन करून होणाऱ्या पेमेंटच्या सूचना प्राप्त होत होत्या. मात्र, जर एखाद्या ग्राहकाने डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले तर त्याची माहिती पेटीएम बॉक्सवर मिळत नव्हती.
डेबिट क्रेडिट कार्ड पेमेंटची सूचना
पेटीएम कंपनीने आता क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांसाठी देखील नवीन साऊंड बॉक्स (PaytM Sound Box) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या साऊंड बाँक्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना आता क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारल्यानंतर लगेच पेमेंट बॉक्सवर किती पेमेंट जमा झाले याची सूचना उपलब्ध होणार आहे. या बॉक्सचा लहान व्यावसायिकांसह मोठ मोठ्या शॉपिंग मॉल, हॉटेल, यासह इतर व्यावसायिकांना जिथे कार्डच्या माध्यमातून पेमेंटचा स्वीकार केला जातो;त्यांना या बॉक्सचा चांगला उपयोग होणार आहे.
टॅप अँड पे-
पेटीएमचा या टॅप अँड पे साऊंड बाँक्स 4-G नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटीने ऑपरेट केला जाणार आहे. या मध्ये 4 वॅटचा साऊंड देण्यात आला आहे. ज्याची आवाजाची क्षमता उच्च आणि स्पष्ट असेल. तसेच या साऊंड बॉक्सच्या माध्यमातून 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटचा स्वीकार करता येणार आहे.
किंमत किती?
पेटीएमचा हा कार्ड पेमेंट साऊंड बॉक्स ग्राहकांना 999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. तसेच त्यानंतर ग्राहकांना पेटीएमच्या या बॉक्सची सुविधा वापरण्यासाठी महिन्याला 99 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.