पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्यूनिकेशन्स लिमिटेडनं (One97 Communications Limited) ग्राहकांना कर्ज आणि इतर आर्थिक सेवा देण्यासाठी रिटेल नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) श्रीराम फायनान्स लिमिटेडसोबत करार केला आहे. कंपनीनं नुकतंच यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे, की या भागीदारी अंतर्गत श्रीराम फायनान्सची (Shriram Finance) उत्पादनं आणि सेवा पेटीएमवर (Paytm) उपलब्ध असणार आहेत. यासोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात कर्जाची (Loan) सुविधाही जोडली जाणार आहे.
व्यापाऱ्यांनंतर ग्राहकांपर्यंत
पेटीएम नेटवर्कवरच्या व्यापाऱ्यांना श्रीराम फायनान्सकडून कर्ज मिळवण्याची सुविधा यात असणार आहे. नंतर ती ग्राहक कर्जापर्यंत वाढवली जाणार आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, की भारतात किरकोळ कर्जाच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. ग्रामीण आणि शहरी भारताच्या मोठ्या सहभागानंतरच यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Boosting access to credit, with our newest partner Shriram Finance
— Paytm (@Paytm) June 30, 2023
Here's what our Founder and CEO @vijayshekhar said on the alliance ?
Read more: https://t.co/hL2ybUUPk7@ShriramGroup pic.twitter.com/o39kgWwHAA
काय म्हणाले पेटीएमचे संस्थापक?
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, की ग्राहकांना कर्जाची सुविधा देण्यासाठी आम्ही आमच्या नवीन धोरणात्मक भागीदार श्रीराम फायनान्ससह एक पाऊल टाकलं आहे. चांगली सुविधा ही आमची वचनबद्धता आहे. त्याला यानिमित्तानं आणखी चालना मिळणार आहे. आम्ही एकत्रितपणे भारतातल्या लहान व्यावसायिक भागीदार आणि उद्योजकांना सेवा देण्यासाठी कर्ज देऊ करू शकू, याचा आम्हाला आनंद आहे, असं ते म्हणाले.
पेमेंट अॅपमध्ये आघाडीवर
वन 97 कम्यूनिकेशन्स लिमिटेडची शाखा असलेली पेटीएम ही पेमेंट मॉनेटायझेशनमध्ये सध्या अव्वल क्रमांकावर आहे. कंपनीच्या अॅपवर यूझर्सच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीचा महसूलदेखील वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आपला विस्तार करत असून विविध वित्तसेवा सुलभ पद्धतीनं देण्याचा कंपनीचा आहे. याचाच एक भाग म्हणून ही कर्जसुविधा दिली जात आहे.