सुट्ट्या म्हटलं की सर्वांना फिरायला जायची घाई असते. तसेच, आता सर्व सुविधा मोबाईलवरच उपलब्ध असल्याने लोकांचा बराच ताण कमी झाला आहे. पण, या सुविधांसह आकर्षंक सवलत मिळाली तर गोष्टच वेगळी. आता Paytm त्यांच्या युझर्सना बुकिंगवर आकर्षक सवलत देत आहे. यामध्ये फ्लाईट, ट्रेन व बसचे बुकिंग करता येणार आहे. पण, ऐन वेळेवर प्लॅन फिस्कटला तर ते बुकिंग कॅन्सलही करता येणार आहे आणि त्यासाठी वेगळे चार्ज देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या मोठ्या विकेंडचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे. ते नक्कीच बुकिंग करण्यास पात्र आहेत.
मिळणार बंपर सवलत
Paytm मार्फत RBL बँक आणि ICICI बँकेद्वारे केल्या जाणाऱ्या डोमेस्टिक फ्लाईटच्या बुकिंवर 15 टक्के तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटच्या बुकिंगवर 10 टक्क्यांची सवलत दिली जात आहे. तसेच, Paytm वॉलेट आणि Paytm पोस्टपेडद्वारे डोमेस्टिक फ्लाईटचे बुकिंग केल्यावर 12 टक्के सवलत मिळणार आहे. याचबरोबर, कंपनीद्वारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सशस्त्र दलांमधील कर्मचाऱ्यांनाही बुकिंगसाठी विशेष दर आकारला जाणार आहे. युझर्सला अधिक बचत करायची असल्यास, झीरो सुविधा शुल्कासह ते फ्लाईट बुकिंग करू शकणार आहेत.
Paytm युझर्स भारतात प्रसिद्ध असलेल्या एअरलाईनमार्फत त्यांची बुकिंग करू शकणार आहेत, यामध्ये इंडिगो (Indigo), विस्तारा (Vistara), स्पाईसजेट (Spicejet), एअर एशिया (AirAsia), अकासा एअर (Akasa Air) आणि एअर इंडियाचा (Air India) समावेश आहे. या सर्व एअरलाईन एकाच जागी मिळत असल्याने युझर्सला अधिक फायदा होणार आहे.
ट्रेनच्या बुकिंगला नाही शुल्क
बसचे तिकिट बुक करण्यासाठी Paytm 25% सवलत देत आहे. यासाठी CRAZYSALE या कोडचा वापर करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त विशिष्ट ऑपरेटर्सकडून बुक केल्यावर 20% सवलत मिळणार आहे. Paytm बेस्ट प्राईस गॅरंटींतर्गत 2500 पेक्षा अधिक बस ऑपरेटर्सच्या तिकिटांवर सर्वात स्वस्त बुकिंगची हमी देत आहे. तसेच, UPI पेमेंटमार्फत केलेल्या ट्रेनच्या बुकिंगवर Paytm शून्य चार्ज आकारत आहे. Paytm अॅपद्वारे युझर्स त्यांच्या PNR चे स्टेट्स चेक करू शकतो, ट्रेनला लाईव्ह ट्रॅक करू शकतो. तसेच, ट्रेनशी संबंधित सर्व समस्यांसाठी या अॅपची सेवा 24X7 उपलब्ध आहे.
कॅन्सलेशन केल्यास शुल्क माफ
Paytm ने त्यांच्या युझर्सला कॅन्सलेशन करताना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. कंपनीने कॅन्सलेशन चार्जेस रद्द केला आहे. त्यामुळे विमान, बस आणि ट्रेनची बुकिंग युझर्स कधीही कॅन्सल करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाही आहे. तसेच, बुकिंगची सर्व रक्कम युझरच्या खात्यात जमा होणार आहे. जर युझर्सना त्यांच्या प्लॅनची खात्री नसल्यास, बुकिंग करताना ते मोफत कॅन्सलेशनचा पर्याय निवडू शकतात.