Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

QR Code on Drugs: आता औषधांच्या पॅकेटवर क्यूआर कोड; ग्राहकांना 'ही' माहिती पाहता येणार

QR codes on drugs

Image Source : www.hindustantimes.com

300 ब्रँड्सच्या औषधांची निर्मिती करताना 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड पॅकेजवर लावणे बंधनकारक असेल. National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) ने हा निर्णय घेतला आहे. डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, लिमसी, सुमो, कॅलपॉल, कोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72, थायरोनॉर्म अशा काही प्रसिद्ध औषधांचा समावेश यात आहे.

QR Code on Drugs: सर्वाधिक मागणी असलेल्या 300 औषधांच्या पॅकेटवर क्यूआर कोड देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेनकिलर, डायबेटिज, व्हिटॅमिन, अँटी प्लेटलेट सह सर्रास वापरण्यात येणाऱ्या औषधांचा यामध्ये समावेश आहे. बनावट औषधे रोखण्यासाठी तसेच ग्राहकांना औषधाबद्दल सर्व माहिती मिळावी, यासाठी क्यूआर कोड अनिवार्य करण्यात आला आहे.

1 ऑगस्टपासून क्यूआर कोड अनिवार्य

300 ब्रँड्सच्या औषधांची निर्मिती करताना आजपासून क्यूआर कोड पॅकेजवर लावणे बंधनकारक असेल. National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) ने हा निर्णय घेतला आहे. डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, लिमसी, सुमो, कॅलपॉल, कोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72, थायरोनॉर्म अशा काही प्रसिद्ध औषधांचा समावेश या यादीत आहे. ज्या औषधांची सर्वाधिक विक्री होती त्या औषधांची यादी NPPA ने मागील वर्षापासून सुरू केली होती.

आरोग्य मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलला यासंबंधी निर्देश दिले होते. (QR Code on Drugs Package) त्यानुसार आता ड्रग्ज रुल्समध्ये बदल करण्यात आला आहे. 1 ऑगस्टपासून 300 औषधे निर्मिती करतानाच त्यांच्या पॅकेटवर क्यूआर कोड टाकण्यात येईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना सांगितले.

क्यूआर कोडवर काय माहिती असेल?

युनिट प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन कोड, API कोड, ब्रँड नेम, उत्पादकाचा पत्ता, बॅच नंबर, बॅच साइज, उत्पादन तारीख, एक्सपायरी तारीख, सिरियल शिपिंग कंटेनर कोड, उत्पादकाच्या परवान्याची माहिती, आयात परवाना, औषध कसे स्टोअर करायचे याची माहिती या क्यूआर कोडमध्ये असेल. ग्राहक हा कोड स्कॅन करून औषधांची सर्व माहिती पाहू शकतात. 

कफ सिरप प्रकरणानंतर कठोर नियम

मागील वर्षी बनावट कफ सिरपच्या सेवनानंतर उझबेकिस्तान, गांबिया देशातील बालकांचा मृत्यू झाला. ही औषधे भारताने निर्यात केली होती. चौकशीमध्ये  फार्मा कंपन्यांच्या निर्मिती प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्या होत्या. 71 कंपन्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. यापैकी 18 कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. काही कंपन्यांचा परवानाही रद्द करण्यात आला. जागतिक स्तरावर भारताची या प्रकरणामुळे नाचक्की झाली.