Mashroom Business Idea: तुम्ही अनेकदा मशरुमची भाजी आणि त्यापासून निर्मित इतर हेल्दी फूड खाल्ले असेलच. मशरुम पासून करी, सूप आणि भाजी बनवूनही खाता येते. मशरुम हे अनेक आजारांवर औषधांप्रमाणे काम करते. यामध्ये असलेल्या सेलेनियम घटकामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय हे मशरुम प्रोटेस्ट कर्क रोगाचा धोका कमी करते. यासारख्या अनेक गुणधर्मांमुळे मशरुम खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मशरुमचे उत्पादन करुन त्याची योग्य प्रकारे मार्केटिंग केल्यास या व्यवसायात चांगला नफा व्यावसायिकांना मिळतो.
Table of contents [Show]
कमी खर्चात सुरु होणारा व्यवसाय
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राहणारे अमर पडवळ यांनी 'व्हिज्युअल इफेक्ट' मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर 2013 पासून चित्रपटसृष्टीत कार्य करणे सुरु केले. अमर यांच्याकडे शेती असल्याने त्यांना शेती करण्याची आवड आणि एखादा व्यवसाय सुरु इच्छा आधीपासूनच होती. परंतु, चित्रपटसृष्टीतील व्यस्ततेमुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. मात्र कोरोना काळात संपूर्ण काम ठप्प झाले आणि त्यामधूनच धडा घेत, अमर यांनी अनेक व्यवसायांबाबत माहिती घेणे सुरु केले. दरम्यान त्यांना ऑयस्टर मशरुम म्हणजेच अळिंबी मशरुम बाबत माहिती मिळाली. कमी लागत मध्ये हा व्यवसाय सुरु होणार होता, त्यामुळे अमर यांनी हा व्यवसाय करण्याचे निश्चित केले.
एका बँगेमधून 2 किलो अळिंबी
जुन्नर तालुक्यातील राजूरी गावात शिवाजी शेटे यांच्या शेतामध्ये अमर यांनी 25 बाय 36 च्या जागेमध्ये 800 बेड उभारुन अळिंबी व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी सगळ्यात आधी गहू आणि सोयाबीनच्या भुस्साचे निर्जंतुकीकरण करुन घेतले आणि तो या 800 बॅग मध्ये भरला. हे सगळं करीत असतांना तापमान आणि आर्द्रता संतुलित राखली. टप्या टप्याने कार्य करीत गेल्यानंतर 40 दिवसांमध्ये साधारण एका बँगच्या माध्यमातून दीड ते 2 किलो उत्पादन मिळाले.
'या' दराने होते विक्री
अळिंबी ही 150 रुपये किलो ने विकली जाते. अमर यांना 25 बाय 36 च्या सेटअप मधून महिन्याला 1600 किलो अळिंबीचे उत्पन्न मिळते. या अळिंबीची 150 रुपये किलो दराने विक्री केली जाते. तर वाळवलेली अळिंबी आणि त्याचे पावडर हे 1000 ते 1200 रुपये किलो दराने विक्री केले जाते.
मार्केटींग कशी केली जाते?
तसेच, याच अळिंबीच्या तुकड्यांचा वापर करुन चॉकलेट, कुकीज, रेडी टू कूक करी, इत्यादी खाद्यपदार्थ तयार करुन त्याची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे उरलेल्या ओल्या अळिंबीचे सेंद्रिय खत तयार करुन 8 रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री केली जाते. तर या सेंद्रिय खताची विक्री महिन्याला 2 टन इतकी होते. ओली आणि वाळलेली अळिंबी, त्यापासून निर्मित खाद्यपदार्थ यापासून अमर यांना वर्षाला 4 लाख रुपये नफा मिळतो. या संपूर्ण खाद्यपदार्थांची मार्केटींग पुणे आणि मुंबईच्या मॉल मध्ये तसेच इ कॉमर्स वेबसाइट द्वारे केली जाते.