Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bing Search Engine: मायक्रोसॉफ्ट Bing सर्च इंजिन Chat GPT फिचरसह लाँच; 48 तासांत 1 मिलियन सबस्क्रायबर

Bing with ChatGPT

गुगल सर्च इंजिन जगभरात सर्वाधिक वापरले जाते. त्यामानाने मायक्रोसॉफ्ट Bing चे युझर्स कमी आहेत. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने बिंग सर्च इंजिमध्ये चॅट जीपीटी हे फिचर अॅड केल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. इंटरनेटवरील सर्चचा अनुभव Chat GPT मुळे अधिक चांगला होणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी अॅक्शन मोडमध्ये आली असून सर्च इंजिनच्या स्पर्धेत गुगलला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. गुगल सर्च इंजिन जगभरात सर्वाधिक वापरले जाते. त्यामानाने मायक्रोसॉफ्ट Bing चे युझर्स कमी आहेत. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने बिंग सर्च इंजिमध्ये चॅट जीपीटी हे फिचर अॅड केल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. इंटरनेटवरील सर्चचा अनुभव Chat GPT मुळे अधिक चांगला होणार आहे. 

48 तासात कमाल (Bing search engine)

मायक्रोसॉफ्ट कंपनीने Open AI या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असून या कंपनीद्वारे Chat GPT हा अत्याधुनिक चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. याद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना चुकटीसरशी मिळणार आहेत. हा चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने Bing सर्च इंजिनमध्ये अॅड करण्याची घोषणा केल्यानंतर 48 तासांत दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. इंटरनेटवर सर्च करताना AI द्वारे कशी उत्तरे दिली जातात, याची युझर्सला उत्सुकता लागली आहे.

"AI तंत्रज्ञानाने सज्ज बिंग सर्च इंजिन कसे काम करते हे पाहण्यासाठी नागरिकांनी जो उत्साह दाखवला आहे, त्यामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. 1 मिलियन पेक्षा जास्त युझर्सनी नव्या बिंग सर्च इंजिनसाठी वेटिंगलिस्ट जॉइन केली आहे", असे ट्विट मायक्रोसॉफ्टच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख युसुफ मेहदी यांनी म्हटले आहे. सध्या फक्त काही ठराविक ग्राहकांना नवे बिंग अॅप वापरता येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत सर्वांसाठी अॅक्सेस दिला जाणार आहे.

एज ब्राऊझरही अपडेट (Edge Browser Updated)

मायक्रोसॉफ्ट कंपनीने Edge browser (एज ब्राऊझर) चे सुद्धा अपडेटेड व्हर्जन ग्राहकांसाठी आणले आहे. सध्या गुगल क्रोम या ब्राऊझरचा सर्वाधिक वापर केला जातो. त्याला टक्कर देण्यासाठी कंपनीने एज ब्राऊझरमध्ये बदल केले आहेत. यामध्ये सुद्धा AI आधारित सर्च फिचर्स अॅड केले आहेत. या अत्याधुनिक AI tools मुळे इंटरनेटवर सर्च करण्याच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत.

काय आहे चॅट जीपीटी (What is Chat GPT)

चॅट जिपीटी हे एक AI सॉफ्टवेअर आहे. ज्याद्वारे आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही क्षणात जाणून घेऊ शकतो. तसेच, आपली काही कामेही हे टूल करू शकते. या टुलला अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चर्चेत आले आहे. या तंत्रज्ञानाच्या साहय्याने अनेकांनी वेबसाईट्स, अॅप डेव्हलप केले आहेत. ज्याचा वापर करून आपण भाषांतर, इमेल, लेख, ब्लॉगही लिहला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त चॅटबॉटला विषय सांगावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुम्हाला उत्तर मिळेल.