Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Now open FD through SBI online : आता घरबसल्या ‘एसबीआय’मध्ये FD सुरू करा

SBI Online FD , SBI, Fixed Deposit Account, FD

रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) आणि केंद्र सरकारला मागील काही दिवसांपासून वाढत्या महागाईचा दर सतावत आहे. रिझर्व्ह बँकेने मागील 5 महिन्यात 4 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या परिस्थितीत रेपो रेट वाढत असल्याने बँकेच्या कर्जदारांवर नकारात्मक परिणाम होत असला तर ठेवीदारांसाठी मात्र आनंदाची बाब आहे. ठेवींचे व्याजदर वाढत आहेत. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर जादा व्याज दिले जाते.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांना घरबसल्या मुदत ठेव खाते (FD through Online Platform) सुरु करता येणार आहे. मात्र यासाठी ग्राहकाकडे नेट बँकिंग असणे आवश्यक आहे. 

रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) आणि केंद्र सरकारला मागील काही दिवसांपासून वाढत्या महागाईचा दर सतावत आहे. रिझर्व्ह बँकेने मागील 5 महिन्यात 4 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या परिस्थितीत रेपो रेट वाढत असल्याने बँकेच्या कर्जदारांवर नकारात्मक परिणाम होत असला तर ठेवीदारांसाठी मात्र आनंदाची बाब आहे. ठेवींचे व्याजदर वाढत आहेत. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर जादा व्याज दिले जाते. 

बँकेची मुदत ठेव योजना (एसबीआय एफडी रेट), आरडी स्कीम्स आणि बचत खात्यांवरील व्याजदर (एसबीआय सेव्हिंग अकाउंट रेट्स) या सर्वांमध्ये अलिकडच्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरातही सातत्याने वाढ केली आहे. ठेवींच्या दरात सुरू असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदार बँकेत एफडी करणे पसंत करत आहेत. 22 ऑक्टोबर रोजी स्टेट बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील दरांमध्ये 80 बेसिस पॉईंटने (0.80%) वाढ केली होती. अशावेळी या वाढीनंतर बँकेत एफडी खाते उघडायचे असल्यास बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.

नेट बँकिंगची गरज (Need Net Banking Access )

एसबीआय एफडी खाती आपण घरबसल्या ऑनलाइन उघडू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त बँकेच्या नेट बँकिंगची गरज आहे. जर तुम्हाला घरबसल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी खाते उघडायचे असेल, तर आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सांगणार आहोत. एसबीआय ऑनलाइन एफडी खाते (SBI Online FD Account) कसे तयार करावे ते स्टेप बाय स्टेप येथे वाचा.

  • स्टेप : 1. एफडी खाते उघडण्यासाठी एसबीआयच्या वेबसाइटवर प्रथम जा.
  • स्टेप : 2. पहिल्यांदा नेट बँकिंगमध्ये लॉग इन करण्यासाठी येथे युजरनेम आणि पासवर्ड टाका.
  • स्टेप : 3. यानंतर, होम पेज पर्यायांतर्गत ठेवी योजना पर्याय निवडा.
  • स्टेप : 4. यानंतर टर्म डिपॉझिटचा पर्याय निवडा आणि नंतर ई-एफडी निवडा.
  • स्टेप : 5. त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचे एफडी अकाऊंट सुरू करू इच्छिता ते निवडा. त्यानंतर पुढे जाण्याचा पर्याय निवडा.
  • स्टेप : 6. यानंतर, कोणत्या खात्यातून पैसे घेतले जातील आणि एफडी खात्यात जमा केले जातील ते ठरवा.
  • स्टेप : 7. यानंतर एफडीचे मुख्य मूल्य भरा. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा पर्याय निवडा.
  • स्टेप : 8. त्यानंतर मॅच्युरिटी डेट मध्ये जावून एफडी केव्हा परिपक्व (Maturity of FD) होईल हे तुम्हीच ठरवा.
  • स्टेप : 9. शेवटी तुम्ही सर्व नियम व अटी निवडा.
  • स्टेप : 10. सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची ऑनलाइन एफडी (Online SBI FD) ओपन होईल.