Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Rent Agreement: घरबसल्या असे ऑनलाईन भाडेकरार तयार करा!

How to create online Rent Agreement

Online Rent Agreement: घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये होणारा लेखी करार म्हणजे भाडेकरार. या करारामध्ये घराचे मालक आणि घर भाड्याने घेणारे भाडेकरू यांच्या सामंजस्याने ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख भाडेकरारामध्ये नमूद केलेला असतो. हा भाडेकरार रजिस्ट्रेशन ॲक्ट, 1908 अंतर्गत किमान 11 महिन्यांसाठी केला जातो.

तुम्ही भाड्याने घर घेण्याचा किंवा देण्याचा विचार करत आहात का? आणि त्याच्यासाठी भाडेकरार कसा करायचा. ही तुमची अडचण असेल तर आम्ही तुमची ही अडचण दूर करण्यासाठी एक चांगला, सरकारमान्य आणि ऑनलाईन पर्याय घेऊन आलो आहोत. या पर्यायाचा वापर करून तुम्ही घरबसल्या तुमचा भाडेकरार ऑनलाईन तयार करू शकता.

घर भाड्याने देताना आणि घेताना सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे भाडेकरार. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये होणारा लेखी करार म्हणजे भाडेकरार. या करारामध्ये घराचे मालक आणि घर भाड्याने घेणारे भाडेकरू यांच्या सामंजस्याने ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख भाडेकरारामध्ये नमूद केलेला असतो. हा भाडेकरार रजिस्ट्रेशन ॲक्ट, 1908 अंतर्गत 11 महिन्यांसाठी केला जातो.

घरबसल्या भाडेकरार डाऊनलोड करा

घरमालक आणि भाडेकरू यांच्यात होणारा करार हा कायद्याप्रमाणे सरकारकडे नोंद करावा लागतो. त्याची नोंदणी करण्यासाठी सरकारला रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी पैसे भरावे लागतात. ही सर्व प्रक्रिया नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयात जाऊन करावी लागते. यासाठी काही एजंट 2 ते ४ हजार रुपये घेतात. पण आता हा खर्च करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही स्वत: हा भाडेकरार तयार करून ऑनलाईन डाऊनलोड करू शकता. यामध्ये तुम्ही भाडे आणि डिपॉझिटची रक्कम टाकून, कालावधी टाकून त्यानुसार अॅग्रीमेंट तयार करू शकता. तसेच यासाठी किती खर्च येऊ शकतो हे सुद्धा तपासू शकता.

राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवरील होम पेजवर चेक स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी ॲण्ड आधार या मथळ्यांतर्गत दिलेल्या Calculate Stamp Duty And Registration Fees यावर क्लिक करा. तुमच्या स्क्रिनवर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्ही किती महिन्यांसाठी करार करणार आहोत, ते टाका. त्याचा कालावधी द्या. डिपॉझिट म्हणून किती रक्कम देणार आहात. त्यातील रिफंडेबल किती असणार आणि नॉन-रिफंडेबल किती असणार, ती टाका. तसेच यामध्ये तुमचे भाडे फिक्स असणार की, ते काही महिन्यांनी बदलणार हा पर्यायदेखील इथे देण्यात आला आहे. पुढे भाड्याची रक्कम टाकून त्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटीसाठी आणि रजिस्ट्रेशनसाठी किती रक्कम भरावी लागेल.हे चेक करून त्यानुसार Online Rent Agreement तयार करू शकता.