Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus Offers: नवीन वर्षात खरेदी करा; जबरदस्त OnePlus स्मार्टफोन ऑफरमध्ये

OnePlus Offers

Image Source : http://www.oneplus.in/

OnePlus Offers: अॅमेझॉन या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वर्षअखेर ऑफरचा धुमधडाका सुरू आहे. जसे की, 'फॅब फोन्स फेस्ट' सेल मध्ये OnePlus Nord 2T 5G हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल. ती ऑफर काय आहे, हे जाणून घेऊयात.

OnePlus Nord 2T 5G Price: Amazon सेलमध्ये प्रीमियम टेक कंपनी OnePlus चा महागडा 5G स्मार्टफोन OnePlus Nord 2T 5G वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे, त्यामुळे जर तुम्हाला नवा फोन खरेदी करायचा असेल तर, उशीर करू नका. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 30,000 रुपये आहे. पण, सेलमध्ये हा मोबाईल मोठया सवलतीमध्ये खरेदी करता येणार आहे.

कसा करायचा खरेदी 

भारतीय बाजारात, OnePlus Nord 2T च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या बँक कार्ड ऑफरसह फोन 26,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर, त्यावर 13,300 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे. याचा फायदा घेत या मोबाईलवर 15,300 रुपयांची सूट घेता येईल. एक्स्चेंज सवलत जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. पण तरी ही तुम्ही वनप्लस 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

OnePlus Nord 2T चे फीचर्स:

या OnePlus स्मार्टफोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.43 -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह 12GB पर्यंत RAM. फोनमध्ये Android 12 वर आधारित OxygenOS सॉफ्टवेअर स्किन देण्यात आले आहे. याच्या 4500mAh बॅटरीला 80 W Super VOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32 MP Sony IMX615 कॅमेरा आहे.