Electric Two Wheeler Sales In May: भारतीय बाजारपेठेत अतिशय वेगवान इलेक्ट्रिक टू व्हीलरला लोक पसंत करत आहेत. लोक पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक दुचाकींना प्राधान्य देत आहेत. मे 2023 मधील इलेक्ट्रिक टू व्हीलर विक्रीचे आकडेही हा दर्शवत आहेत. FADA (Federation of Automobile Dealers Association) डेटानुसार, मे 2023 मध्ये एकूण 104829 इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री झाली आहे. तर एप्रिल 2023 मध्ये, इलेक्ट्रिक टू व्हीलरची एकूण विक्री 66466 युनिट्स होती. यात ओला कंपनीने बाजी मारली आहे.
Ola व्यतिरिक्त, Okaya EV प्रायव्हेट लिमिटेड ने मे 2023 मध्ये एकूण 3875 युनिट्सची विक्री केली. तर याच कंपनीने मे 2022 मध्ये एकूण 19 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या. यानुसार, कंपनीने वार्षिक आधारावर प्रचंड विक्री केली आहे.
Table of contents [Show]
ओलाची प्रचंड मागणी
मे 2023 मध्ये, इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी Ola इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी (OLA electric) ने एकूण 28469 युनिट्सची विक्री केली आहे. तर मे २०२२ मध्ये ओला कंपनीने एकूण ९२६९ युनिट्सची विक्री केली होती. एप्रिल 2023 मध्ये ओला कंपनीने एकूण 21882 युनिट्सची विक्री केली होती. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर, ओला कंपनीच्या विक्रीमध्ये 30.10 टक्के वाढ दिसून येते.
टीव्हीएस मोटर दुसऱ्या क्रमांवर
टीव्हीएस मोटर ऑटो क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने मे 2023 मध्ये 20261 युनिट्सची विक्री केली होती. तर मे 2022 मध्ये, कंपनीने केवळ 478 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या होत्या, याचा अर्थ टीव्हीएस मोटर कंपनीच्या विक्रीत महिन्या-दर-महिना आधारावर 132.19% ची वाढ दिसून येते. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने एकूण 8726 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली.
अथर एनर्जी तिसऱ्या क्रमांकावर
एथर एनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहे. एथर एनर्जीने मे 2023 मध्ये एकूण 15226 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. तर एप्रिल 2023 मध्ये कंपनीने 7746 युनिट्सची विक्री केली. तसेच मे 2022 मध्ये कंपनीने 3338 युनिट्सची विक्री केली होती.
बजाज ऑटो चौथ्या क्रमांकावर
बजाज ऑटो समूह चौथ्या क्रमांकावर आहे . मे 2023 मध्ये, बजाज ऑटो ग्रुपने एकूण 10028 इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री केली. तसेच एप्रिल 2023 मध्ये कंपनीने एकूण 4013 युनिट्सची विक्री केली. तर मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 1812 युनिट्सची विक्री केली.
OKAYA EV ची शानदार कामगिरी
Okaya EV ने, मे 2023 मध्ये एकूण 3875 युनिट्स विकल्या. तसेच, एप्रिल 2023 मध्ये, कंपनीने एकूण 1562 युनिट्सची विक्री केली होती. तर मे 2022 मध्ये, कंपनीने केवळ 19 इलेक्ट्रिक टू व्हीलर युनिट्सची विक्री केली होती, म्हणजे वार्षिक आधारावर, कंपनीने एकूण 20294.74 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शविली आहे. मे 2023 मध्ये विक्रीच्या बाबतीत कंपनी आठव्या क्रमांकावर आहे.
Hero Electric Vehicle 10 व्या स्थानावर
Hero Electric Vehicle Pvt Ltd ने मे 2023 मध्ये एकूण 2109 इलेक्ट्रिक दुचाकी आणि एप्रिल 2023 मध्ये 3331 युनिट्सची विक्री केली. 2022 मध्ये, कंपनीने एकूण 2971 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या आहेत.