सध्या वाढत्या इंधनांच्या किंमतीमुळे लोकांचा कल सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक (EV) वाहनांकडे वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि विक्री करायला सुरुवात केली आहे. ओला कंपनीने देखील आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरचे नाव 'ओला एस वन एअर मॉडेल' (Ola S1 Air EV) असे आहे.
या स्कूटरची विक्री 28 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. मात्र 31 जुलै 2023 पासून या स्कूटरच्या किंमतीत वाढ होणार आहे. जर तुम्हालाही ओला कंपनीची ही नवीन स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुम्ही 28, 29, 30 जुलै या तीन दिवसात तिची खरेदी करू शकता. जेणेकरून तुम्हाला ही स्कूटर जवळपास 10,000 रुपयांनी स्वस्त खरेदी करता येईल. ओला इलेक्ट्रिकचे भाविश अग्रवाल यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
10,000 रुपयांची होईल बचत
ओला इलेक्ट्रिकचे भावेश अग्रवाल (Bhavesh Agrawal) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, 31 जुलै 2023 पासून ओलाच्या नवीन स्कूटरची किंमत वाढणार आहे. ग्राहकांनी जर 28, 29, 30 जुलै या तीन दिवसात 'Ola S1 Air EV' ही स्कूटर खरेदी केली, तर त्यांना या स्कूटरसाठी 1,09,999 रुपये मोजावे लागतील. मात्र हीच स्कूटर 31 जुलै 2023 पासून खरेदी केली, तर ग्राहकांना 1,19,999 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जुलै महिन्याच्या 28, 29, 30 या तीन दिवसातच खरेदी करा. जेणेकरून तुमच्या 10,000 रुपयांची बचत होईल.
Ola S1 Air स्कूटरचे फीचर्स जाणून घ्या
ओला कंपनीच्या S1 Air या स्कूटरमध्ये कंपनीने 3kwh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून 6bhp पॉवर जनरेट करते.
कंपनीने असा दावा केला आहे की, बॅटरी पूर्णतः चार्ज केल्यावर 125 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. यामध्ये कंपनीने इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन मोड समाविष्ट केले आहेत.
ही इलेक्ट्रिक स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये जास्तीत जास्त 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे, असेही कंपनीने सांगितले आहे.
ओला S1 Air स्कूटरमध्ये कंपनीने ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, रिमोट स्टार्ट, पुश बटन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, नेविगेशन, कॉल एसएमएस अलर्ट, जिओ फेसिंग, अँटी थेफ्ट अलार्म यासारखे फीचर्स दिले आहेत.
तसेच म्युझिक कंट्रोल, ओटीए एक्स्टर्नल स्पीकर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, हेडलाईट एलईडी, बूट लाईट आणि डिव्हाईस मोड देण्यात आले आहेत.
Source: hindi.financialexpress.com