इलेक्ट्रिक स्कुटर्समधील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिकने झिरो डाऊनपेंटवर S1 स्कुटर्स विक्रीचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून यासाठी 60 महिन्यांची कर्ज योजना आणली असून सर्वात कमी व्याजदर असेल, असा दावा कंपनीने केला आहे.
इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या बाजारात ओला इलेक्ट्रिकचे वर्चस्व आहे. कंपनी मागील अनेक महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री केली आहे. बाजारातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने 60 महिन्यांची सर्वात कमी व्याजदराची कर्ज योजना आणली आहे. यात कर्जदाराला 6.99% दराने ओला स्कुटर खरेदीसाठी वाहन कर्ज मिळणार आहे. 60 महिन्यांच्या कालावधीत हे कर्ज फेडावे लागेल.
ओलाने S1 साठी आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एल अॅंड टी फायनान्स या कंपन्यांशी वाहन कर्जासाठी करार केला आहे. अशाच प्रकारे एथरने सुद्धा वाहन कर्ज योजना आणली आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून ओलाकडून कर्ज योजना आणण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिकचे देशभरात 700 सेंटर्स आहेत. ऑगस्टपर्यंत ओलाचा रिटेल शोरुम्सचा आकडा 1000 वर जाणार आहे. कंपनीकडून सध्या S1 Air, S1, and S1 Pro ही तीन इलेक्ट्रिक स्कुटर्सची मॉडेल्स विक्री केली जातात. S1 ची किंमत 99999 रुपयांपासून सुरु आहे.
S1 साठी झिरो डाऊनपेमेंटचा पर्याय कंपनीने कर्ज योजनेत उपलब्ध केला आहे. अर्थात कंपनीकडून 100% कर्ज मंजूर केले जाईल. हे कर्ज 60 महिने कालावधीसाठी असून त्याचा व्याजदर 6.99% इतका आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार S1 चा किमान मासिक हप्ता 2899 रुपये इतका कमी असेल. मे महिन्यात ओला इलेक्ट्रिकने 35000 S1 स्कुटर्सची विक्री केली. एका महिन्यात S1ची ही रेकॉर्डब्रेक विक्री ठरली आहे.