Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Plan to launch Electric Car: ई-स्कुटरनंतर आता ओला थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार

Ola Electric Car

Ola Plan to launch Electric Car: अॅपबेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीने थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती केली होती. त्याला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

इलेक्ट्रिक स्कुटरला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने आता थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून 2024 मध्ये पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात लॉंच करण्यात येईल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. (Ola plan to launch first e car in year 2024)

ओला इलेक्ट्रिकने विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या संशोधनाला प्राधान्य दिले आहे. कंपनीच्या S1 या इलेक्ट्रिक स्कुटरला भारतीयांना जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास दुणावला आहे. कंपनी 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत इलेक्ट्रिक कार लॉंच करेल, अशी माहिती ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर जी.आर अरुण कुमार यांनी दिली.

ओला इलेक्ट्रिक कारची डिझाइन आणि तंत्रज्ञान अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिक स्कुटरमधी काही तंत्रज्ञानाचा देखील विचार केला जात असल्याचे अरुण कुमार यांनी सांगितले. इलेक्ट्रिक कारमध्ये सॉफ्टवेअर, सेफ्टी सिस्टम, टेक्नॉलॉजी, सेल्स अशा बहुतांश गोष्टी या सामायिक असतील, अे कुमार यांनी सांगितले. आमच्या मते इलेक्ट्रिक कारच्या बाबतील 30% ते 40% काम पूर्ण झाले आहे, असे अरुण कुमार यांनी सांगितले.

भारतातील इलेक्ट्रिक स्कुटरच्या बाजारपेठेवर ओला इलेक्ट्रिकची पकड आहे. ओलाने सलग चार महिन्यात सर्वाधिक खपाच्या इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादकांच्या यादीत अव्वल स्थान राखले आहे. RBSA अॅडव्हायझर्स या संस्थेच्या मते वर्ष 2030 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकलची बाजापपेठ 150 बिलियन डॉलर्स इतकी वाढणार आहे. त्यामुळे ओलाकडून यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

ओला इलेक्ट्रिक कारची किंमत किती असेल? (How much Price Expected of E Car)

ओला इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबाबत गेल्या वर्षी ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावेश अगरवाल यांनी माहिती दिली होती. एका कार्यक्रमात अगरवाल म्हणाले होते की पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत 50000 डॉलरपेक्षा कमी ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक कार श्रेणीत आघाडीवर असलेल्या टेस्ला, ह्युंदाय आणि टाटा मोटर्स यांच्याशी स्पर्धा करण्याचा ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा उद्देश आहे.

'Ola'ने डिसेंबरमध्ये स्कुटरची बंपर विक्री (Ola Sale 25000 Scooters in Dec 2022)

ओलाने डिसेंबर 2022 या महिन्यात 25000 स्कुटरची विक्री केली. या बंपर विक्रीने इलेक्ट्रिक स्कुटरच्या बाजारपेठेत ओला इलेक्ट्रिकचा वाटा 30% इतका वाढला आहे.जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांचे मुख्य केंद्र होण्याच्या दृष्टीने भारतासाठी वर्ष 2022 निर्णायक ठरेल, असे मत ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावेश अगरवाल यांनी व्यक्त केले. ओला इलेक्ट्रिकने वर्ष 2022 मध्ये तब्बल 1.5 इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री केली आहे. ओलाने सप्टेंबर 2021 मध्ये भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लॉंच केली होती. सध्या कंपनीच्या S1, S1 Pro आणि S1 Air ही तीन मॉडेल्स बाजारात आहे. यांची किंमत 84999 रुपयांपासून आहे. S1 ला पूर्ण चार्ज होण्यासाठी सरासरी 4 तास 30 मिनिटांचा अवधी लागतो. ही स्कुटर 90 किमी प्रती तास या वेगाने धावू शकते.  येत्या दोन वर्षात कंपनी इलेक्ट्रिक स्कुटरची आणखी मॉडेल्स बाजारात आणणार आहे. त्याशिवाय कंपनी लिथियम आयन बॅटरीच्या निर्मितीमध्ये देखील उतरणार आहे.